Samvad Setu Media

[gtranslate]

Virat Kohli Shatters Sachin Tendulkar’s All-Time ‘Centuries Record’, Scripts History

Virat Kohli Shatters Sachin Tendulkar’s All-Time ‘Centuries Record’, Scripts History

Virat Kohli creates history

Virat Kohli now holds the record for scoring the most hundreds in a single format

वनडेमध्ये विराटने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली; रांचीमध्ये किंग कोहलीचा जलवा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सीरिजची पहिली मॅच रविवार, 30 नोव्हेंबर 2025 रोजी रांची येथे खेळली गेली. या सामन्यात भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहलीने जबरदस्त खेळी करत पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींचे मन जिंकली आहेत.

या मॅचमध्ये कोहलीने 135 धावांची शानदार सेंच्युरी ठोकली. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सेंच्युरी करण्याआधीच कोहलीने एक मोठा टप्पा पार केला. त्याने आपल्या एकदिवसीय (ODI) कारकिर्दीत 7000 धावा पूर्ण करून इतिहास रचला आहे. हा विक्रम खास असा की, कोहलीने हा माईलस्टोन एम.एस. धोनीच्या होम ग्राउंडवर रांचीमध्ये गाठला.

या भव्य कामगिरीमुळे विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आणखी वर पोहोचला आहे. त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तो आज जगातील सर्वात विश्वासू आणि धडाडीचा बॅट्समन मानला जातो.

कठीण परिस्थितीतही धीराने खेळ करत कोहलीने टीम इंडिया साठी महत्त्वपूर्ण धावा केल्या आणि पुन्हा एकदा सिद्ध केले की तो खऱ्या अर्थाने “किंग कोहली” का आहे.

विराट कोहलीची दमदार इनिंग –

या मॅचमध्ये विराट कोहलीने फक्त 120 बॉल्समध्ये 135 रन्सची दमदार इनिंग खेळली. ज्यामध्ये 11 फोर आणि 7 सिक्सरचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट टीमची सुरुवात चांगली झाली नाही आणि यशस्वी जयस्वाल फक्त 18 रन्स करून माघारी परतला.

यशस्वीच्या सुरुवातीच्या विकेटनंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मॅच फिरवली. दोघांनी चांगली पार्टनरशिप करत मोठा स्कोअर उभा केला. या इनिंगमध्ये विराट कोहलीने सिक्सरचा पाऊस पाडला. या इनिंगमध्ये विराट कोहलीने एकूण 7 सिक्सर मारले.

विराट कोहलीने सुरुवात वेगवान केली पण नंतर तो सावरला आणि एकीकडे विकेट पडत असताना, तो इनिंग सांभाळत होता. अशा परिस्थितीत कोहलीने 102 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावली.

या मॅचमध्ये विराट कोहलीने हाफसेंच्युरी झळकावून इतिहास रचला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक 50 पेक्षा जास्त रन्स करणारा प्लेअर बनला. कोहलीने 50 रन्सचा टप्पा ओलांडण्याची ही 59 वी वेळ होती.

सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, मायदेशात आणि परदेशात दोन्ही ठिकाणी आघाडीवर आहे. त्याने 264 वेळा 50 पेक्षा जास्त रन्स केले आहेत, तर कोहली फक्त 227 वर आहे.


रोहित-विराटची दमदार कामगिरी-

पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात मात्र काही खास झाली नाही. फक्त चौथ्याच षटकात यशस्वी जैस्वाल 18 धावांवर बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये रोहित शर्माचा एक झेलही सुटला. पण त्यानंतर रोहित आणि विराट कोहली याने डाव सावरला. रोहित-विराट यांनी मिळून 136 धावांची शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेवर दबाव आणला. या सामन्यात रोहित शर्माने शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडत वनडेमधील सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू बनला.

रोहित OUT झाला, पण कोहलीने ठोकले शतक

टीम इंडिला दुसरा धक्का 22व्या षटकात बसला, जेव्हा रोहित 51 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. 27व्या षटकात ऋतुराज 8 धावांवर माघारी परतला, तर 31व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर 13 धावांवर बाद झाला. यानंतर विराट कोहलीने जबरदस्त खेळी करत 38व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. 102 चेंडूत शतक ठोकणाऱ्या कोहलीने अखेरीस 11 चौकार आणि 7 षटकारांच्या जोरावर 120 चेंडूत 135 धावा केल्या. त्याला नांद्रे बर्गरने बाद केले. शेवटी केएल राहुलनेही 60 धावांची महत्वाची खेळी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आणि टीम इंडियाने पहिल्या डावात 350 धावांचा डोंगर उभारला.

दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात

350 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात हर्षित राणाने त्यांना दोन जबरदस्त धक्के दिले. आधी रयान रिकेल्टन बाद झाला आणि त्याच ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्या वेळी आफ्रिकेचा स्कोर फक्त 7 धावा होता. यानंतर पाचव्या षटकात मार्करमही अर्शदीप सिंगचा शिकार झाला. 

पुढे जोर्जी आणि मॅथ्यू यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत चांगली भागीदारी रचली. मात्र 15व्या षटकात कुलदीप यादवने जोर्जीला बाद करून भारताला मोठा दिलासा दिला. त्यानंतर ब्रेविसने चांगली खेळी केली, पण 22व्या षटकात हर्षित राणा पुन्हा चमकला आणि ब्रेविस 37 धावांवर बाद झाला.

तत्पूर्वी, रांचीमध्ये विराट कोहलीचा पराक्रम पुन्हा एकदा दिसून आला. त्याच्या भविष्याबद्दलच्या अटकळांना उधाण आले असताना, रविवारी जेएससीए स्टेडियमवर विराट कोहलीने एक अशी खेळी केली जी केवळ त्याच्या टीकाकारांनाच फटकारली नाही तर हजारो प्रेक्षकांनाही उत्साहाने भरून टाकली. कोहलीने त्याचे 52 वे एकदिवसीय शतक झळकावले, संयम, तंत्र आणि आक्रमकतेने भरलेली ही खेळी खेळत संघाला एक मजबूत धावसंख्या गाठून दिली.

या सगळ्यात, कोहली एका टोकावर खंबीरपणे उभा राहिला. त्याने स्ट्राईक फिरवून आणि वाईट चेंडू सोप्या चौकारांमध्ये रूपांतरित करून डाव पुन्हा रुळावर आणला. डावाच्या शेवटी चेंडू जुना झाला होता, त्यामुळे शॉट घेणे कठीण झाले होते. तरीही, कोहलीने गीअर्स बदलले आणि जलद धावा केल्या. त्यामुळे या सामन्यामध्ये विराटने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे, हे नक्की आहे.

 

– आकांक्षा देशमुख
– संवाद सेतू

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.