Samvad Setu Media

[gtranslate]

भारताचा दणदणीत विजय! India U19 ने इंग्लंडला 100 धावांनी हरवत सहाव्यांदा अंडर 19 विश्वचषक जिंकला | U19 World Cup 2026

भारताचा दणदणीत विजय! India U19 ने इंग्लंडला 100 धावांनी हरवत सहाव्यांदा अंडर 19 विश्वचषक जिंकला | U19 World Cup 2026

U19 World cup

Add Your Heading Text Here

भारताने पुन्हा एकदा अंडर १९ च्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं..!
इंग्लंड ला तब्बल १०० धावांनी मात देत भारताने सहाव्यांदा अंडर १९ विश्वचषकावर आपलं नाव कोरलं..!

झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे झालेल्या अंडर १९ च्या विश्वचषकामध्ये १६ संघ सहभागी झाले होते. पण भारताने जगाला दाखवून दिलं की खरा विश्वविजेता भारतच आहे. U19 World Cup 2026 चे सामने 15 जानेवारीपासून 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत खेळले गेले. टीम्सना सुरुवातीला ग्रुप स्टेज → Super Sixes → Knockouts (सेमीफाइनल आणि Final) असा मार्ग पार करावा लागला.

इंग्लंडच्या राष्ट्रीय खेळावर भारताचं वर्चस्व..!

भारतने ६ वेळा अंडर १९ विश्वचषकावर आपलं नाव कोरत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. महत्त्वाचं म्हणजे भारताने फाइनल मध्ये इंग्लंडला त्यांच्याच राष्ट्रीय खेळात तब्बल १०० धावांनी मात दिली. खेल किसिका भी हो जितेगा तो इंडिया ही असे स्टेटस भारताच्या विजयानंतर प्रचंड वायरल झाले. आपल्याच राष्ट्रीय खेळात जगज्जेता बनण्याचं इंग्लंडच स्वप्न भारताने पूर्ण होऊ दिलं नाहीये.

India U19 ने पहिले बॅटिंग केली आणि वैभव सूर्यवंशी याच्या ८० चेंडूत १७५ धावांच्या तुफानी खेळीमुळे 411/9 धावा केल्या. आणि इंग्लंडसमोर ४१२ धावांचा डोंगर उभा केला. फायनल मॅच मध्ये एवढ्या धावांचा पाठलाग करणं म्हणजे अश्यक्यच असतं. इंग्लंडने प्रचंड प्रेशर मध्ये खेळायला सुरुवात केली. Ben Dawkins आणि Caleb Falconer यांनी भारताच्या या विशाल धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण बाकी कोणीच हे प्रेशर झेलू शकलं नाही. त्यामुळे इंग्लंडची टीम ४० ओव्हर मध्ये ३११ धावा बनवून ऑल आउट झाली. अजूनही १० ओव्हर बाकी होत्या इंग्लंडच्या बॅट्समननी थोडा सय्यम दाखवला असता तर सामना अजून रंगतदार होऊ शकला असता.

मात्र भारताने इंग्लंडला त्यांच्याच राष्ट्रीय खेळात वन साइडेड हरवत जगाला एक स्टेटमेंट दिलंय. ये यंग इंडिया है ये खेलता है और वन साइडेड जितता है..!

इंडियाचा वैभव फायनलचा हीरो..!

वैभव सूर्यवंशी याने फायनल मध्ये केलेली खेळी ही अतिशय मनोरंजक आणि थक्क करणारी होती. वैभवने Final मध्ये 80 बॉलमध्ये 175 धावा केल्या विश्वचषकातील Final मधील हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे. यामध्ये 15 चौकार आणि 15 षटकार मारले. बसला ना धक्का? आंतरराष्ट्रीय स्तरावर असा खेळ करणं सोप्प नाहीये. त्याची पारी पूर्णपणे धक्‍कादायक होती आणि याच धुव्वदार बॅटिंगने टीम इंडियाचा स्कोअर 400+ वर नेण्यास मदत केली. वैभवने फाइनल मध्ये केलेली ही खेळी आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने केलेली बॅटिंग यामुळे त्याला Player of the Match आणि Player of the Tournament! मिळालं. वैभवने केलेल्या या रेकॉर्ड मुळे ही फाइनल इतिहासातील उत्कृष्ट U19 Final पैकी एक फाइनल ठरली.

Captain Ayush Mhatre

captain ayush mhatre
हा विश्वचषक वैभवने आपल्या नावावर केला असला तरी भारताला विजय मिळवून देण्यामागे भारतीय अंडर १९ टीम चा कॅप्टन आयुष म्हात्रेचे सुद्धा तेवढेच कष्ट आहेत. कप्तान आयुष म्हात्रेने शांत पण मजबूत खेळ केला आणि 50+ धावांची महत्वाची पारी बजावली. त्याच्या नेतृत्वाखालीच भारताने डोमिनेट करत Final मॅच जिंकली आणि भारताने वर्ल्ड कप लिफ्ट केला.

या विश्वचषकात खेळलेली भारतीय टीम..!
Aaron George,
Vaibhav Sooryavanshi,
Ayush Mhatre (c),
Vihaan Malhotra,
Vedant Trivedi,
Abhigyan Kundu (wk),
RS Ambrish,
Kanishk Chouhan,
Khilan Patel,
Henil Patel,
Deepesh Devendran
Harvansh Pangalia,
Mohamed Enaan,
Udhav Mohan,
Kishan Kumar Singh

 

1. 2000 – श्रीलंका
भारताचा पहिलाच U19 World Cup
कर्णधार: मोहम्मद कैफ
2. 2008 – मलेशिया
विराट कोहलीचा संघ
फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला हरवलं
3. 2012 – ऑस्ट्रेलिया
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली
Final मध्ये ऑस्ट्रेलियावर विजय
4. 2018 – न्यूझीलंड
पृथ्वी शॉ कर्णधार
ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये हरवलं
5. 2022 – वेस्ट इंडिज
यश धुल कर्णधार
इंग्लंडवर फायनलमध्ये विजय
म्हणजे 2000, 2008, 2012, 2018, 2022 हे भारताचे अधिकृत 5 World Cup title होते. आणि आता भारताकडे सहावं टायटल सुद्धा एड झालंय.

भारत किती वेळा Final मध्ये हरला?
भारत 3 वेळा Under-19 World Cup Final हरलाय.

1. 2006 – श्रीलंका
फायनलमध्ये पाकिस्तान कडून पराभव
2. 2016 – बांगलादेश
फायनलमध्ये वेस्ट इंडिज कडून पराभव
तोच सामना जिथे ब्रॅथवेटने शेवटच्या ओव्हरला मॅच फिरवली
3. 2020 – दक्षिण आफ्रिका
फायनलमध्ये बांगलादेश कडून पराभव
बांगलादेशचा पहिलाच U19 World Cup

म्हणजेच आत्तापर्यंत झालेल्या एकूण १६ अंडर १९ विश्वचषकांपैकी भारताने तब्बल ९ फाइनल खेळल्यात. यावरून भारतीय टीमचं अंडर १९ वर्ल्ड कप वर असणारं वर्चस्व दिसून येतं. या विजयामुळे देशभरात क्रिकेट-प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राजकीय नेते, क्रिकेट विश्लेषक आणि वरिष्ठ खेळाडूंनी टीमला अभिनंदन केलं आणि Team India चं भविष्य उज्वल असल्याचं म्हटलं आहे. या विजयामुळे आमची छाती अभिमानाने भरुन आली आहे. संवाद सेतूकडून संपूर्ण भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन..!

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.