Samvad Setu Media

[gtranslate]

Sydney Bondi Beach Shooting: 11 Killed in Terror Attack During Jewish Festival

Sydney Bondi Beach Shooting: 11 Killed in Terror Attack During Jewish Festival

Sydney Bondi Beach Shooting

11 killed in terror attack at Sydney’s Bondi Beach :

सिडनीतील जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अचानक गोळीबार, जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ


ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तसेच ही गोळीबाराची घटना जगभरात पसरली आहे. सिडनी शहरात ज्यूंच्या उत्सवादरम्यान ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या गोळीबाराच्या घटनेत इंग्लंडचा माजी क्रिकेटर माइकल वॉन हा थोडक्यात बचावला आहे.

ही अंधाधुंद गोळीबाराची घटना सिडनी शहरातील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा मानल्या जाणाऱ्या बोंडाई बीचवर घडली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या बीचवर जगभरातून पर्यटक जात असतात. त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण जग हादरलं आहे. तसेच अशी घटना घडूच कशी शकते? असा प्रश्न ऑस्ट्रेलियातील नागरिकांसह पंतप्रधानांना देखील पडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

रविवारी दुपारी ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर हनुक्का साजरा करणाऱ्या ज्यूंवर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यात अकरा जण ठार झाले आणि एक हल्लेखोरही ठार झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना गोळ्या घातल्या. अधिकाऱ्यांच्या मते, एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये उत्तर बोंडी बीचवर अनेक मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ही घटना धक्कादायक आणि अत्यंत दुःखद असल्याचे वर्णन केले आहे.

गोळीबार हा दहशतवादी हल्ला घोषित –

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर झालेल्या गोळीबाराला दहशतवादी हल्ला घोषित करण्यात आला आहे. न्यू साउथ वेल्सचे पोलिस आयुक्त माल लिनेन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या हल्ल्यात तिसरा संशयित सहभागी होता का याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना शोधून काढले आहे. एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे.

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्याने एका रेस्टॉरंटमध्ये लपून आपला जीव वाचवला. त्याने सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट केले. वॉनने इंस्टाग्रामवर लिहिले की, “बोंडी येथील रेस्टॉरंटमध्ये अडकणे खूप भयानक होते. मी आता घरी सुखरूप पोहोचलो आहे. दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार. या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकासोबत माझे विचार आहेत.”

ऑस्ट्रेलियात २९ वर्षांनंतर सामूहिक गोळीबार :

ऑस्ट्रेलियात सामूहिक गोळीबाराच्या घटना सामान्य नाहीत. १९९६ मध्ये पोर्ट आर्थर येथे झालेल्या एका भयानक हल्ल्यानंतर कडक बंदुकी कायदे लागू करण्यात आले होते, ज्यामध्ये एका एकमेव हल्लेखोराने ३५ जणांचा बळी घेतला होता. ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनोलॉजीनुसार, २०२३-२४ दरम्यान ऑस्ट्रेलियात एकूण ३१ बंदुकीने हत्याकांड नोंदवण्यात आले. हा सर्वात अलीकडील उपलब्ध डेटा आहे.

येथे सामूहिक गोळीबार दुर्मिळ आहे. सिडनीच्या पूर्व उपनगरात अशी सर्वात अलीकडील घटना घडली. एप्रिल २०२४ मध्ये, बोंडी जंक्शनमधील वेस्टफील्ड शॉपिंग सेंटरमध्ये एका व्यक्तीने सहा जणांवर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये हल्लेखोर जागीच ठार झाला. हल्लेखोराला जागीच गोळी मारण्यात आल्याचे वृत्त आहे.

भारतातील ज्यू समुदायासाठी सुरक्षा वाढवण्यात आली.
भारतातील ज्यू समुदायासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर अहवालातून असे दिसून आले आहे की, दहशतवादी संघटना भारतातील ज्यू सणांवर आणि ज्यू संस्थांवर मोठे हल्ले करण्याची योजना आखत असू शकतात.
दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईला विशेषतः लक्ष्य केले जाऊ शकते. हनुक्काचा आठ दिवसांचा ज्यू सण १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे.

दहशतवादी घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी संवेदना व्यक्त केली.
भारतीय पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियातील दहशतवादी घटनेबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, की आज ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो, ज्यामध्ये हनुक्का या ज्यू सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्यात आले. भारतातील लोकांच्या वतीने, मी प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांबद्दल सहानुभूती आणि संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत. भारत दहशतवादाविरुद्धच्या लढाईला पाठिंबा देतो.

ही घटना ऑस्ट्रेलियातील जवळजवळ तीन दशकांतील सर्वात भीषण सामूहिक गोळीबार आहे. मागील सामूहिक गोळीबार २८ एप्रिल १९९६ रोजी पोर्ट आर्थर हत्याकांड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी झाला होता. या घटनेत, मार्टिन ब्रायंट नावाच्या व्यक्तीने पोर्ट आर्थर, टास्मानिया येथे ३५ लोकांचा बळी घेतला आणि २३ जण जखमी झाले. त्यानंतर, देशात कडक बंदूक नियंत्रण कायदे लागू करण्यात आले.

– आकांक्षा देशमुख
– संवाद सेतू

 

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.