Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off
स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न अखेर रद्द, प्रकरण का आहे चर्चेत ?
भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार प्लेअर म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना आता चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्या लग्नाची चर्चा चालू आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता पलाश मुच्छल याच्यासोबत तिचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले. आता मात्र हे लग्न थेट रद्द करण्यात आले आहे. तशी माहिती स्मृती मानधनाने दिली आहे.
तर पलाशने एका मुलीसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट पुढे आल्यानंतर स्मृतीने हा निर्णय घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्मृती मानधनाने पलाशसोबतचे लग्न रद्द केलेले असले तरी पलाशसाठी तिने सर्वांकडे एक विनंती केली आहे. तिच्या याच विनंतीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
काय म्हणाली स्मृती ?
स्मृती मानधानाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर स्टोरीच्या माध्यमातून पलाशसोबतच्या लग्नावर भाष्य केले आहे. आता हे लग्न रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती तिने दिली आहे. सोबतच आता आयुष्यात पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे मतही स्मृती मानधनाने व्यक्त केले आहे. लग्न रद्द झालेले असले तरीही मी क्रिकेट खेळणं सोडलेलं नाही, असंही तिने स्पष्ट केलंय. भारतासाठी मला आणखी ट्रॉफी आणायच्या आहेत, असे ती म्हणाली आहे. विशेष म्हणजे पलाशसोबतचे लग्न मोडलेले असले तरीही तिने पलाशच्या कुटुंबीयांचीही काळजी घेतली आहे.
पहिली प्रतिक्रिया !
मला आता माझ्या लग्नाचे प्रकरण संपवायचे आहे. तुम्हीदेखील हा विषय संपवावा, असे आवाहन तिने आपल्या चाहत्यांना केले आहे. यासह तिने पालशच्या आणि स्वत:च्या कुटंबाविषयीही भाष्य केले आहे. आमच्या दोन्ही कुटुंबाच्या खासगीपणाचा सर्वांनीच आदर करावा, असे म्हणत तिने दोन्ही कुटुंबांविषयीची चिंता व्यक्त केली आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी आमची प्रायव्हसी जपा असे आवाहन तिने केले आहे. काही दिवस स्मृती मानधनाचे लग्नाचे प्रकरण मागे पडले होते. आता ते नव्याने चर्चेत आले असून यात पुढे नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय आहे प्रकरण ?
23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगतील प्रियकर पलाश मुच्छल याच्यासोबत स्मृती मानधना लग्नबंधनात अडकणार होती. संगीत, हळद आणि मेहंदीचे खास कार्यक्रम झाली. संगीतच्या कार्यक्रमात स्मृती मानधना सारी दुनिया से जीत के मैं आयी हूं इधर गाण्यावर पलाशसाठी डान्स करताना दिसली. स्मृती मानधना आणि पलाश यांचे संगीत, हळद आणि मेहंदीचे कार्यक्रम जय्यत झाली. संपूर्ण देशाचे लक्ष स्मृती मानधना हिच्या लग्नाकडे लागले होते.
अचानक वडिलांच्या तब्येतीचे कारण देत स्मृती मानधना आणि पलाशचे लग्न पुढे ढकलण्यात आले. यादरम्यानच पलाश याचे धक्कादायक स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरून अंदाज लावण्यात आला की, पलाश याचा खरा चेहरा स्मृती मानधना हिच्यापुढे आल्यानेच तिने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता स्मृती मानधना हिने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहित स्पष्ट शब्दात सांगितले की, लग्न रद्द करत आहे.
यामुळे स्मृती मानधना हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे स्पष्ट दिसत आहे. हेच नाही तर या पोस्टसोबतच तिने सोशल मीडियावरून पलाश मुच्छल याला अनफॉलो केले. या सर्व गोष्टींवरून आता एक स्पष्ट होत आहे की स्मृती व पलाश यांच्यामध्ये काहीही ठीक नाही. आणि या दोघांचे नाते देखील आता संपले आहे.
लग्नाच्या एकदिवसआधी काय घडलेलं?
लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत सर्वकाही सांगलीत धुमधडाक्यात लग्न सुरु होतं. यादरम्यान, स्मृतींच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे वडील रुग्णालयात दाखल होताच स्मृतीने कोणताही विचार न करता विवाहसोहळा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पलाश मुच्छलही तणावाच्या झटक्याने रुग्णालयात दाखल झाला. दोन कुटुंबांवर आलेल्या या दुहेरी संकटाने लग्न केवळ स्थगितच नव्हे, तर अनिश्चिततेच्या दरीत कोसळले. त्यानंतर स्मृतीने लग्नातील मेहंदी-संगीताचे सर्व फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवले होते.
आपल्या खाजगी आयुष्यातून बाहेर पडून आता स्मृती मानधना पुन्हा क्रिकेटकडे लक्ष देणार आहे. तिने क्रिकेट प्रॅक्टिसला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे आता स्मृती मानधना या सगळ्यातून कशी बाहेर येते हे देखील पाहणे तितकेचं महत्वाचे असेल.