Severe Cold!!! राज्यात कडाक्याची थंडी ! काय घेतली पाहिजे काळजी ?
राज्यातील तापमान कमी झाल्याने आता थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील अनेक भागात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. मात्र वातावरणात होणार बदल पाहता आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
वातावरणात ज्या पद्धतीने गारवा वाढत चालला आहे, तो पाहता घरातील वृद्ध आजारी लोकांच्या तब्येतीची अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. कारण बदलत्या हवामानाचा परिणाम सर्वात आधी त्यांच्यावर होतो, ज्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ शकतो.
दिवाळीनंतर राज्यभरात सगळीकडे हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. थंडी पडू लागल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असतो. सगळीकडे थंडगार वातावणार असल्यामुळे अनेक लोक सतत आजारी पडू लागतात. तसेच थंडी वाढल्यानंतर सगळीकडे साथीच्या आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे या दिवसांमध्ये बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील.
त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये गोठवणारी थंडी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी थंड वारे वाहतायत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊन तुम्ही आजारी पडू शकता.आरोग्याची योग्य ती देखभाल करण्यास सुरुवात करा.थंडीच्या दिवसांत आपल्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे, यासाठी काही माहिती जाणून घेऊया.
महत्वाचे घरगुती उपाय
– खोकला आणि छातीत जळजळ यापासून आराम मिळण्यासाठी गूळ उपयुक्त आहे. याशिवाय हे अँटी बॅक्टेरियल सुद्धा आहे, जे इंफेक्शन कमी करण्यास मदत करते. यासाठी काळी मिरी बारीक करून गरम पाण्यात उकळा. आता त्यात जिरे आणि गूळ घाला. तयार झालेला काढा गरम गरम प्या.
– छातीत साचलेल्या श्लेष्मा किंवा कफपासून आराम मिळवण्याचा स्टीमचा फायदा होतो. यासाठी पाणी गरम करून एका मोठ्या भांड्यात ओता. यानंतर डोक्यावर टॉवेल किंवा कोणतेही जाड कापड ठेवा आणि ते डोक्यापासून खाली चेहरा पूर्ण झाकून घ्या. आता ही वाफ साधारण ५ ते १० मिनिटे घ्या. या पाण्यात तुम्ही ओवा सुद्धा टाकू शकता. याने लवकर आराम मिळतो.
– जेष्ठमध कफ वितळण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे छातीत उष्णता निर्माण होते आणि जळजळ आणि सूज यापासून आराम मिळतो. हे छातीतील कंजेशन दूर करण्यास मदत करते. त्याच्या मदतीने तुम्ही हर्बल चहा बनवू शकता.
– आहारामध्ये बदल :
आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य, दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
तसंच हिवाळ्यामध्ये अधिक प्रमाणात भाज्या,सूप आणि फळांचं सेवन करावे.
फळ,आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा झाल्यास आजारांविरोधात लढण्यात मदत मिळते.
थंडीमध्ये शक्यतो तेलकट – तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावे.
– हायड्रेटेड रहा :
हिवाळ्यात तुम्ही डिहायड्रेशनचेही बळी होऊ शकता. कारण तुम्हाला थंड वातावरणात नैसर्गिकरित्या तहान लागत नाही. दररोज ७-८ ग्लास पाणी पिणे केवळ महत्त्वाचे आहे . डिहायड्रेशनमुळे देखील तुम्हाला जास्त थंडी जाणवू शकते.
– व्यायाम करणं गरजेचंच
शरीर फिट राहण्यासाठी आहारासोबतच नियमित व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. शरीराची योग्य पद्धतीनं हालचाल होणं आवश्यक आहे. आपल्या फिटनेससाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन नियमित व्यायाम करावा. थंडीत तुम्ही योगासन करणं महत्वाचं आहे.
– घर उबदार ठेवा
तुमचे घर चांगले इन्सुलेटेड आणि ड्राफ्ट-फ्री असेल याची काळजी घ्या. त्याच वेळी थर्मोस्टॅटला आरामदायक तापमानात ठेवा. थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी रात्री पडदे बंद करा आणि ड्राफ्ट बाहेर ठेवण्यासाठी दारेआणि खिडक्यांवर ड्राफ्ट स्टॉपर्स वापरा.अंगावरती उबदार ब्लँकेट्स ओढून झोपा.
– कपड्यांचे करा लेअरिंग
कपड्यांचे लेअरिंग करणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते. हातात, हातमोजे पायात सॉक्स,मान उबदार ठेवण्यासाठी टोपी,स्कार्फ घालणे आवश्यक आहे.पातळ कपड्यनमध्ये थर्मल्स वापरणे विसरू नका.
– हिवाळ्यात पंखा लावू नका
गरम हवा हलकी असते आणि थंड जड. त्यामुळे कमी तापमानााच्या दिवसांमध्ये खोलीतली थंड हवा खाली राहते आणि गरम किंवा उबदार हवा सिलिंगजवळ म्हणजेच वर जाते, हा विज्ञानाचा साधा नियम आहे. विशेषतः उंच सिलिंगच्या घरांमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये फॅन कमी स्पीडवर रिव्हर्स सेटिंगमध्ये वापरला तर सिलिंगजवळची उबदार हवा खाली येते आणि खालची थंड हवा वर जाते. त्यामुळे हिवाळ्यात पंखा लाऊ नये.
– दारूमुळे शरीराची उष्णता कायम राहते
थंडी म्हणजे मद्यप्रेमींसाठी एक पेग रिचवण्याची नामी संधीच. अल्कोहोलमुळे शरीराचं तापमान उष्ण राहतं, असं मानलं जातं. म्हणूनच तर अगदी अठराव्या शतकापासून गिर्यारोहक मोहिमांवर जाताना सोबत अल्कोहोलमिश्रित पेय ठेवतात. इतकंच नाही तर स्किईंग करून आल्यावर अनेकांची पावलं आपोआप बारकडे वळतात.
– नियमित मॉइश्चरायझर लावणे
हिवाळ्यात त्वचा मोठ्या प्रमाणावर कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. कोरडी पडलेली त्वचा पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझर लावणे विसरू नये. मॉइश्चरायझरचा वापर केल्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यास मदत होईल.
त्यामुळे शक्य होईल तेवढ थंडीत घरातच रहा. जेव्हा तापमान कमी होते तेव्हा गरज असेल तरच घराबाहेर पडा. यासोबतच शरीर उबदार ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. गरम अन्न घ्या आणि उबदार कपडे घाला. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.