Samvad Setu Media

[gtranslate]

Ranveer Singh–Akshaye Khanna Thriller ‘Dhurandhar’ Becomes Third Highest Grosser of the Year

Ranveer Singh–Akshaye Khanna Thriller ‘Dhurandhar’ Becomes Third Highest Grosser of the Year

Ranveer Singh–Akshaye Khanna

बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ची धूम; रणवीर–अक्षयचा ‘धुरंधर’ ठरला वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट


रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ प्रदर्शित होऊन १२ दिवस पूर्ण झाले असले तरी बॉक्स ऑफिसवरील त्याची घोडदौड अजूनही थांबलेली नाही. पहिल्या आठवड्यापासूनच दमदार कमाई करत असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचा मजबूत प्रतिसाद मिळवला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ‘धुरंधर’ने यावर्षी प्रदर्शित झालेल्या इतर सर्व प्रमुख चित्रपटांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट न होता स्थिर वाढ कायम असल्याचे दिसून येत आहे.

येत्या आठवड्याच्या शेवटी (वीकएंड) प्रेक्षकसंख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यामुळे कमाईतही लक्षणीय उडी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रीन्सवरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘धुरंधर’ने १२ व्या दिवशी किती कमाई केली?

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या ‘धुरंधर’ने १२ व्या दिवशी ३० कोटी रुपयांची कमाई केली. त्याची हिंदी ऑक्युपन्सी ४२.८८% होती. शोच्या बाबतीत, सकाळचे शो २४.१०%, दुपारचे शो ४०.४६%, संध्याकाळचे शो ५०.४२% आणि रात्रीचे शो ५६.५३% होते. पहिल्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटी त्याच्या चांगल्या कमाईमुळे, चित्रपटाने हे सिद्ध केले की तो खरोखरच प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे.

जगभरातील कलेक्शन –

या चित्रपटाने भारतात फक्त १२ दिवसांत ४११.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आता जगभरात ६२३.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या आठवड्याच्या शेवटी हा आकडा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या, चित्रपट कमाईच्या बाबतीत “छावा” आणि “कांतारा चॅप्टर १” पेक्षा थोडा मागे आहे, परंतु “धुरंदर” च्या कमाईच्या गतीमुळे, तो लवकरच “छावा” आणि “कांतारा चॅप्टर १” या दोघांनाही मागे टाकू शकतो.

चित्रपटातील कलाकार –

“धुरंधर” चित्रपटात रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्यासह सारा अर्जुन, संजय दत्त, राकेश बेदी आणि अर्जुन रामपाल सारख्या कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटातील “FA9LA” हे गाणे इंस्टाग्राम रील्सवर व्हायरल होत आहे. या गाण्यातील अक्षय खन्नाच्या नृत्याचे खूप कौतुक होत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात सारा अर्जुन आणि रणवीर सिंगची पहिली ऑनस्क्रीन जोडी आहे.

रणवीर होता ब्लॉकबस्टरच्या शोधात-

‘धुरंधर’पूर्वी रणवीर सिंग शेवटचा अजय देवगण स्टारर ‘सिंघम अगेन’मध्ये दिसला होता, ज्यात त्याची एक कॅमिओ भूमिका होती. त्याआधी तो ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’मध्ये झळकला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र त्याआधी आलेले रणवीरचे तीन चित्रपट ‘८३’, ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. त्यामुळे रणवीर बराच काळ अशा चित्रपटाच्या शोधात होता जो बॉक्स ऑफिसवर धमाका करेल, आणि अखेर ‘धुरंधर’च्या माध्यमातून त्याने इतिहास रचला आहे.

तासंतास व्हायची कास्टिंगवर चर्चा-

या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेच्या कास्टिंगसाठछी, निवडीसाठी आम्ही बराच वेल घेतला. कोणत्या भूमिकेसाठी कोणता अभिनेता सर्वात जास्त फिट, योग्य वाटेल याचाच आमच्या डोक्यात सतत विचार होता. चित्रपटात प्रत्येक अभिनेत्याला फायनल करण्यापूर्वी जोरदार चर्चा व्हायची, खूप वाद घालायचो आम्ही. या चित्रपटासाठी संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन सुटेबल ठरतील की नाही, याचीच आम्ही चर्चा करायचो. आम्ही आणि आदित्या धर 2-4 तास बसायचो आणि प्रत्येकाची निनड योग्य ठरेल की नाही, ते वर्क होील की नाही, फक्त यावरच बोलत असायचो. लोकांना कशा पद्धतीने सरप्राईज करता येईल ? या लोकांऐवजी इतर कोणालाही या भूमिकेसाठी घेता येईल का ? असे विचार असायचे डोक्यात. सुरुवातीला, या चित्रपटासाठी आमच्या मनात काही चेहरे होते ज्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगली कामगिरी केली होती, परंतु नंतर आम्ही चित्रपटाच्या व्याप्तीनुसार मोठी नावं निवडली दिग्दर्शकांनी म्हटल आहे.

धुरंधर चित्रपट उत्तम आहेच. पण सर्वात जास्त कौतुक होतय ते अक्षय खन्नाचं. त्याने पाकिस्तानातील ल्यारीचा डॉन रहमान डकैत रंगवला आहे. अक्षय खन्नाचा अभिनय आणि त्याने गाण्यावर धरलेला ठेका सगळीकडे व्हायरल झाला आहे. लोक या गाण्याचे रिल्स बनवत आहेत.

खरंतर या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका आहे. पण कौतुक मात्र सर्वात जास्त अक्षय खन्नाचं होतय. धुरंधरच्या रिलीज आधी खराब रिव्यू आणि बॅड पीआरची चर्चा होती. पण चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर वातावरण बदलून गेलय.

चित्रपटाच्या यशात कथानकासोबतच संगीताचाही मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. ‘धुरंधर’मधील गाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रील्स आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.

एकूणच, दमदार अभिनय, थरारक कथा आणि लोकप्रिय संगीत यांच्या जोरावर ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली असून, पुढील काही दिवसांत त्याच्या एकूण कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.