Samvad Setu Media

[gtranslate]

Mumbai Local ‘Lifeline’ becomes ‘Deathline’ instead? You will be shocked to see the accident statistics!

Mumbai Local ‘Lifeline’ becomes ‘Deathline’ instead? You will be shocked to see the accident statistics!

mumbai local

Mumbai Local लाईफलाईन’ ऐवजी ठरते ‘डेथलाईन’ ? अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का !

स्वप्नांची नगरी म्हणून मुंबई शहराला ओळखले जाते. याच मुंबई शहरात दररोज लाखो नागरिक व्यवसाय व नोकरीसाठी रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र आता लाइफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल डेथलाईन बनत आहे का ? कारण गेल्या काही वर्षांमध्ये समोर आलेली माहिती ही धक्कादायक आहे.

मुंबई शहरात लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होत आहे. गर्दी वाढत असल्याने अपघातांची संख्या देखील वाढली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये गेल्या आठ वर्षात ८२७३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, ही धक्कादायक आकडेवारी मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात सादर केली आहे. तर २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांतच ४४३ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे समोर आलेली माहिती ही खूपच चिंताजनक आहे.

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली लोकल आता मृत्यूचा सापळा बनली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे म्हणजे दररोज मृत्यूशी खेळण्यासारखे झाले आहे, हेच मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हजारो मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीमुळे मुंबईचा लोकल प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे.

Accidents प्रमुख कारणे :

रेल्वे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असली तरी या अपघातांची वेग वेगळी कारणे आहेत. रेल्वे ट्रॅकवर होणारे सर्रास अतिक्रमण, ट्रॅक ओलांडताना ट्रेनखाली येणे, धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले जाणे, तोल जाऊन खाली पडणे यामुळे अपघात होत असतात. हा मृत्यूंचा आकडा मात्र दरवर्षी वाढत जात आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील रेल्वे अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी देखील नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

Mumbai Local अपघाताची धक्कादायक आकडेवारी

  • 2018 : या वर्षात ट्रॅक ओलांडताना तब्बल 1022 जणांचा मृत्यू झाला, तर धावत्या ट्रेनमधून पडून 482 प्रवाशांनी जीव गमावला.
  • 2019 : ट्रॅक ओलांडताना 920 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 426 मृत्यूची नोंद झाली.
  • 2020 : कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासावर निर्बंध आले होते, त्यामुळे अपघातांची संख्या काहीशी कमी दिसली. ट्रॅक ओलांडताना 471 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 134 मृत्यू झाले.
  • 2021 : निर्बंध शिथिल होताच अपघातांची संख्या पुन्हा वाढली. ट्रॅक ओलांडताना 748 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 189 मृत्यूची नोंद झाली.
  • 2022 : हे वर्षही अपघातांच्या दृष्टीने चिंताजनक ठरले. ट्रॅक ओलांडताना 654 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 510 मृत्यू झाले. धावत्या ट्रेनमधून पडून झालेल्या मृत्यूंची संख्या लक्षणीयरित्या वाढली.
  • 2023 : ट्रॅक ओलांडताना 782 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 431 मृत्यू झाले.
  • 2024 : ट्रॅक ओलांडताना 674 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 387 मृत्यू झाले.
  • 2025 (मे पर्यंत): या वर्षाच्या सुरुवातीचे केवळ पाच महिनेही मृत्यूच्या तांडवाचे साक्षीदार ठरले आहेत. ट्रॅक ओलांडताना 293 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 150 मृत्यू झाले आहेत.

 

Passenger खबरदारी घेणे गरजेचे :

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहेत. जेवढी रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे तेवढीचं प्रवाशांची देखील जबाबदारी आहे की काळजी घेऊन प्रवास करावा. रेल्वे ट्रॅकवरून चालणे बंद करावे, रेल्वे ट्रॅक ओलांडताना काळजी घ्यावी. धावत्या लोकलमधून बाहेर डोकावू नये, तसेच गर्दीमध्ये चढताना व उतरताना काळजी घ्यावी. रेल्वे प्रशासनाच्या नियमनाचे पालन करावे. अशा प्रकारे जर प्रवाशांनी देखील खबरदारी घेतली तर नक्कीच प्रवाशांचा जीव वाचेल यामध्ये काही शंका नाही.

मुंबई लोकल LifeLine’ ऐवजी ‘DeathLine’ बनली ?

  • मुंबई लोकलमध्ये अपघाती मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक असून मोठ्या प्राणात वाढले आहे.
  • गर्दी हे मुख्य कारण असून प्रचंड गर्दीमुळे प्रवासी ट्रेनच्या दारात उभे राहतात आणि प्रचंड गर्दीमुळे खाली पडून त्यांचा मृत्यू होतो.
  • बिघडलेले वेळापत्रक हे देखील महत्वाचे कारण आहे. लोकल सेवेचे बिघडलेले वेळापत्रक देखील प्रवाशांसाठी एक मोठा अडथळा ठरत आहे.
  • गर्दीमुळे लोकल प्रवाशांसाठी आणखी धोकादायक बनली आहे आणि हा प्रवास अनेकदा मृत्यूशी खेळण्यासारखा असल्याचं देखील अनेक वेळा बोलल जात आहे.


मुंबईच्या लोकल सध्या गर्दीसाठी कुप्रसिद्ध झाली आहे. ट्रेन चुकू नये म्हणून दरवाजाबाहेर लोंबकळत असलेल्या लोकांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई लोकलमध्ये सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 8.30 या वेळेत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रेल्वेत शिरण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण दरवाजावर लटकून प्रवास करतात. गर्दीमुळे दरवाजावरील प्रवासी बाहेर फेकले जातात आणि त्यात अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागतो.

दरम्यान सध्या मुंबई लोकलचे अपघात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे, रेल्वेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि धोकादायक प्रवास टाळणे किती महत्त्वाचे आहे, हेच या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. रेल्वे प्रशासनावरही सुरक्षित प्रवासासाठी ठोस उपाययोजना करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची हमी कधी मिळणार ? मृत्यूची झुंज कधी संपणार असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.