Who was Maharani Tarabai?
महाराणी ताराबाई यांचा इतिहास नेमका काय आहे ?
सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासाठी साक्ष देतात. महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिवइतिहास’ घडला तेव्हा यामध्ये
स्त्रियांचा देखील सहभाग होता. अशीच एक कर्तबगार स्त्री होती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या संस्थापिका आणि शिवाजी महाराजांचे पुत्र महाराज राजाराम यांच्या धर्मपत्नी महाराणी ताराबाई.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी ताराराणी यांनी सतत प्रयत्न केले. अनेक लढायांना त्या सामोऱ्या गेल्या. आज महाराणी ताराबाई यांची पुणयतिथीनिमित्त त्यांच्या इतिहासाची आठवण करू.
कोण होत्या Maharani Tarabai ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती मुलगी. शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वैधव्य आल्यावरही ही राणी डगमगली नाही. त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं. मुघलांना, स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या. त्यांना आयुष्यात अनेकवेळा बंड-लढायांचा सामना करावा लागला. पतीनिधनानंतर 61 वर्षं त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या.
ताराबाई यांचा Birth !
ताराबाई यांचा जन्मच लढाऊ वडिलांच्या पोटी म्हणजे शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला होता. लष्करी शिक्षणाचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच आला असणार. राजाराम महाराजांच्या मृत्यूच्यावेळेस त्यांचे वय 25 असावे. त्यांचा मुलगा शिवाजी (दु) यांचेही वय अत्यंत कमी होते. 1701 साली ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी यांना पन्हाळा येथे राज्याभिषेक करवून घेतला आणि त्या कारभार पाहू लागल्या.
किल्ल्यांचे Protection
औरंगजेब एकेक किल्ला हस्तगत करत असताना ताराबाई या रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी, धनाजी जाधव सेनापती यांच्या मदतीने स्वराज्याचं रक्षण करत होत्या. त्यांनी सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड, सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले. शाहू राजांनी ताराराणींच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या. 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली. 12 जानेवारी 1708 रोजी शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला.
काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून कारभार सुरू केला. पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे.
वंशज व गादी History
सातारच्या शाहू महाराजांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ताराबाई यांनी आपला अज्ञातवासात असलेला नातू रामराजे यांना शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार रामराजे हेच साताऱ्याचे वंशज ठरले. म्हणजे ताराबाई यांना कोल्हापूरमधून जरी बाहेर पडावे लागले असले तरी त्या आपला वंश साताऱ्यात कायम करण्यात यशस्वी झाल्या. 25 डिसेंबर 1749 रोजी शाहू राजांचा मृत्यू झाला. त्यानंतर रामराजे साताऱच्या गादीवर आले.
TaraRani Death
14 जानेवारी 1761 साली मराठी सैन्याचा पानिपतमध्ये मोठा पराभव झाला. तर 4 डिसेंबर रोजी 1761 रोजी ताराबाई यांचं निधन झालं.
औरंगजेबाला जे एकामागून एक विजय मिऴत गेलेले होते, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते त्यातून सर्व राष्ट्राला वाचविण्याचे सर्व श्रेय आपल्याला ताराबाईच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील तिच्या कुशल निपुणतेला द्यावे लागते.
TaraRani यांचा पन्हाळ्याचा वाडा
ताराराणी यांचा पन्हाळ्याचा वाडा आजही सुस्थितीत आहे. वाड्याला साजेसा भव्य दरवाजा आजही 300 वर्ष झाली उत्तम राखला गेला आहे. दरवाज्यावर शंभू महादेवाची पिंड कोरली असून त्यावर आजही जरीपटका फडकत आहे.
मोठ्या दगडी भिंती मधून जाणाऱ्या पायऱ्या आजही भव्यतेची साक्ष देतात. वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर लाकडी नक्षीकाम आजही उत्तम स्थितीमध्ये आहे.
वाड्याच्या चौकाला लागून असणाऱ्या त्या काळातील तुरुंगाच्या खोल्या, दरवाजे आहेत. त्याला असणारे दगडी खांब भक्कमतेची साक्ष देतात. चौकटीवरती गणपतीची कोरीव मूर्ती आहे. वाड्याच्या परिसरात छ्त्रपती शिवाजी महाराज मंदिर, शंभू महादेव मंदिर असून उत्तम स्थितीत आहे.
ताराबाई यांच्या कार्याची दखल
राजाराम महाराजांच्या मृत्युमुळे झालेल्या परिस्थितीत ताराबाईंनी जे अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन घडवले होते. त्याबद्दल इतिहासकारांनाही त्यांचे कौतुक करावे लागले. ताराबाईच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला. त्यांनी लवकरच सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल, राज्यातील खेडीपाडी संघटित करणे, मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली.
तर अशा या कर्तबगार स्त्रीच्या इतिहासाची आजही आठवण केली जाते. त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेला लढा आज ही स्मरण केला जातो. ताराराणी यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक स्त्रीने राणी ताराबाई यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे.
Akansha
Samvad Setu
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.