Samvad Setu Media

[gtranslate]

How Does the Winter Season Raise the Risk of Kidney Stones?

How Does the Winter Season Raise the Risk of Kidney Stones?

Kidney stones

Do you know that you are at Greater Risk for Kidney stones in winter?

हिवाळ्यात मुतखड्याचे प्रमाण जास्त का ? काय आहे कारण ? लक्षणं कोणती ?

हिवाळा जितका आल्हाददायक तितकाच काहींसाठी समस्यांनी भरलेला. काहींना त्वचेच्या समस्या काहींना संधिवाताच्या इ. या समस्यांपैकी एक म्हणजे किडनी स्टोन, ज्यामुळे या हंगामात अनेकदा जास्त त्रास होतो. मानवी जीवनशैलीतील बदल, चुकीचा आहार आणि पाण्याचे अपुरे सेवन यामुळे आजारपणांची अनेक नवी रूपे दिसू लागली आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे मुतखडा (Kidney Stone / Renal Calculi).

वर्षभर हा त्रास दिसत असला तरी हिवाळ्यात मुतखड्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते, असे वैद्यकीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. थंड हवामान, शरीरातील पाण्याचे बदल, जीवनशैलीतील बदल आणि जैविक प्रतिक्रिया यामुळे हिवाळा हा या आजारासाठी सर्वाधिक जोखमीचा काळ मानला जातो.

विशेषतः तरुणांमधे या समस्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही अनेकदा यामागची कारणं असतात. एकेकाळी वयोवृद्ध व्यक्तींचा आजार मानला जाणारा मूतखडा हा आता तरुणांमध्ये सामान्यपणे आढळून येत आहे. मूत्रामध्ये खनिजे आणि क्षार मोठ्या प्रमाणात असतात. लघवीतील खनिजे आणि क्षारांची पातळी वाढते तेव्हा हे स्फटिक एकत्र होऊन दगडांचे रूप घेतात. कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अॅसिडपासून तयार झालेले हे खडे मूत्रमार्गात अडथळा आणतात, ज्यामुळे वेळीच उपचार न केल्यास तीव्र वेदना, संसर्ग किंवा मूत्रपिंडाचे नुकसान होते.

म्हणूनच, हिवाळ्यात किडनी स्टोनचे रुग्ण का वाढतात आणि कोणती लक्षणं त्यांना ओळखण्यासाठी महत्त्वाची आहेत, समजून घेऊयात.

मूतखडाच्या लक्षणे कोणती?

पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना होणे, लघवी करताना जळजळ, लघवीवाटे रक्त येणे, मळमळणे किंवा वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे. जर मूत्रपिंडातील खड्यांवर योग्य वेळी उपचार केले नाहीत त्यांचा आकारा वाढू लागतो आणि मूत्रमार्गात संसर्ग आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ लागते.

उपचार हा त्यांच्या आकारावर आणि मूतखड्याच्या स्थानानुसार ठरविला जातो. लहान खडे बहुतेकदा जास्त द्रव पदार्थांचे सेवन आणि वेदना कमी करून नैसर्गिकरित्या निघून जातात. मोठ्या खड्यांन्ना लिथोट्रिप्सी (शॉक वेव्ह थेरपी) किंवा एंडोस्कोपिक पध्दतीने काढले जाते. गंभीर प्रकरणांमध्ये, मूत्रपिंडाचे कार्य पुनर्संचयित करण्यासाठी मिनीमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

हिवाळ्यातच मुतखडा होण्याची कारणे

१) पाण्याचे कमी सेवन (Dehydration)

हिवाळ्यात लोकांना तहान कमी लागते. दिवसभर थंड वातावरणामुळे आपल्याला पाणी पिण्याची गरज वाटत नाही.
शरीरात पाणी कमी झाले की लघवी घट्ट होते, त्यातील खनिजे एकत्र येऊन कॅल्शियम ऑक्झलेट, फॉस्फेट, यूरिक अॅसिड स्टोन तयार होऊ लागतात.

२) त्वचेतील पाण्याचे बाष्पीभवन वाढणे

बाहेर थंडी असली तरी शरीराची तापमान-नियंत्रण प्रक्रिया चालूच राहते. शरीरातून हळूहळू पाण्याचा तुटवडा होतो आणि लघवी अधिक सांद्र होते, स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते.

३) हिवाळ्यातील आहारातील बदल

थंडीत लोक गरम, मसालेदार, तळलेले आणि प्रथिनांनी भरपूर अन्न खातात. उदा. मटण, चिकन, अंडी, दही-चीज, कोरडे मेवे, चहा-कॉफी, चॉकलेट. या पदार्थांमधील ऑक्झलेट, सोडियम आणि यूरिक अॅसिड वाढते → स्टोन तयार होतो.

४) व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम संतुलनातील बदल

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने विटॅमिन D चे मेटाबॉलिझम बदलते. यामुळे शरीर जास्त प्रमाणात कॅल्शियम शोषू शकते → अतिरिक्त कॅल्शियम लघवीत येतो → स्टोनचा धोका वाढतो.

५) कमी शारीरिक हालचाल

हिवाळ्यात शरीर निष्क्रिय होते. चयापचय (Metabolism) मंदावतो, कॅल्शियमचे संतुलन बिघडते आणि स्टोन साचण्यास मदत होते. त्याचबरोबर हिवाळ्यात चहा-कॉफी जास्त सेवन केल्याने अतिरिक्त कॅफिन डिहायड्रेशन वाढवते.


मुतखड्याचे प्रकार

लघवीतील कोणता खनिज पदार्थ जास्त प्रमाणात साचतो यावरून स्टोनचे प्रकार ठरतात. त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
1. कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन
2. यूरिक अॅसिड स्टोन
3. स्ट्रुवाइट (इन्फेक्शन) स्टोन
4. सिस्टीन स्टोन — दुर्मिळ, पण आनुवंशिक


मुतखड्यावर उपचार

मुतखड्यावर उपचार हे स्टोनचा आकार, जागा आणि प्रकार यावर अवलंबून असतात. यासाठी विविध प्रकारचे उपचार केले जातात.

१) औषधोपचार (Medicine management)
* ३–६ मिमी लहान स्टोन स्वतः बाहेर पडतो.
* वेदना कमी करण्यासाठी NSAIDs
* स्टोन खाली सरकण्यासाठी Tamsulosin / Silodosin सारखी औषधे
* इन्फेक्शन असल्यास अँटिबायोटिक्स

२) जास्त पाणी पिणे
दिवसाला ३–४ लिटर पाणी पिणे स्टोन बाहेर निघण्यास मदत करते. त्यामुळे सातत्याने पाणी प्यावे.

३) शस्त्रक्रीयाविना उपचार

* ESWL (Shock Wave Lithotripsy)
– बाहेरून शॉक वेव्ह देऊन स्टोन मोडला जातो.
* URS (Ureteroscopy)
– ट्यूब घालून स्टोन लेझरने मोडला जातो.

४) सर्जिकल उपचार
* PCNL (Percutaneous Nephrolithotomy)
– मोठे किंवा खोल बसलेले स्टोन काढण्यासाठी सर्वात प्रभावी.


त्यामुळे मूतखडा टाळण्यासाठी देखील अनेक गोष्टी आहेत व त्याचे पालन केले पाहिजे. दिवसाला कमीत कमी 3 लिटर पाणी पिऊन हायड्रेटेड राहावे, मीठाचे सेवन मर्यादित करणे, प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन टाळणे,ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, लिंबूवर्गीय फळं आणि फायबर यांचाही रोजच्या आहारात समावेश करा. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते.
शर्करायुक्त आणि कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळा. चयापचय आणि किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज व्यायाम करा.अशारितीने तरुणांनी त्यांच्या मूत्रपिंडाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आणि ते योग्यरित्या कार्य करत असल्याची वेळोवेळी खात्री करणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला ही मुतखडा झाला असेल किंवा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दिलेल्या गोष्टींचे पालन केले तर नक्कीच मूतखडा दूर होईल किंवा होणारचं नाही. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःनेच घ्यावी.

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.