Samvad Setu Media

[gtranslate]

India’s Tejas Fighter Jet Crash in Dubai

India’s Tejas Fighter Jet Crash in Dubai

Tejas Fighter Jet Crash

India’s Tejas Fighter Jet Crash in Dubai

दुबई एअर शोदरम्यान भारताच्या फायटर जेट तेजसचा अपघात ते तेजस’च्या निर्मितीचा प्रवास !

भारताच्या स्वदेशी बनावटीचं फायटर जेट तेजस देशाची शान म्हणून ओळखलं जात आहे. तेजस विमान म्हणजे भारताचा स्वाभिमान मानला जातो. मात्र याचं तेजस विमान दुर्घटनेची बातमी समोर आल्यानंतर जगात एकच चर्चा सुरू झाली. जाणून घेऊया तेजस विमान का चर्चेत आहे ? तेजस विमान दुर्घटना कधी ? तेजस विमानाचे महत्व काय ?

21 नोव्हेंबर रोजी दुबई एअर शोदरम्यान (Dubai Airshow 2025) दरम्यान भारताच्या स्वदेशी बनावटीचं फायटर जेट तेजसचा अपघात झाला. हा अपघात दुबईतील अल मकतूम इंटरनेशनल एअरपोर्टवर (Al Maktoum International Airport) दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी (स्थानिक वेळेनुसार) झाला. भारतीय हवाई दलाच्या (IAF) एका तेजस विमानाने प्रदर्शनीय उड्डाण करत असताना नियंत्रण गमावलं आणि ते थेट जमिनीवर कोसळलं. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे. ही घटना एअर शोच्या शेवटच्या दिवशी घडली. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित हा अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र तेजस हे भारतीय हवाई दलाचं सर्वात आधुनिक विमानांपैकी एक असल्याने या अपघाताचं गांभीर्य अधिक वाढलं आहे. असं असतानाच अपघातानंतर तेजस विमानांची किंमत आणि भविष्यात या विमानांच्या पुढील अवृत्त्या विकसित करण्यासंदर्भातील विषयांवरुन चर्चा रंगू लागली आहे.

शेवटच्या काही सेकंदात काय घडले?

दुपारी २ वाजून १० मिनिटांनी विमानाच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक दाखवत असताना विमान कोसळले. उड्डाणानंतर काही क्षणातच लढाऊ विमान वेगाने खाली येत कोसळले. त्यामुळे आकाशात आगीसह काळ्या धुराचे लोट पसरले. एअर शो पाहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांच्या समोर ही घटना घडली.

तेजसची सुरुवात

1983 मध्ये भारत सरकारने जुन्या MiG-21 ला बदलण्यासाठी LCA (Light Combat Aircraft) प्रकल्पाची घोषणा केली. 1984 मध्ये या प्रकल्पासाठी ADA (Aeronautical Development Agency) तयार करण्यात आली.

पहिले उड्डाण आणि पुढील टप्पे (Milestones & First Flights)

1995 मध्ये पहिला टेक्नोलॉजी डेमोन्स्ट्रेटर TD-1 तयार झाला आणि 4 जानेवारी 2001 रोजी TD-1 ने बंगलुरुमध्ये 18 मिनिटांचे यशस्वी उड्डाण घेतले, हा प्रकल्पासाठी ऐतिहासिक क्षण होता.

2003 मध्ये PV-1, 2007 मध्ये PV-3 ने सुपरसोनिक उड्डाण साधले. 2011 मध्ये तेजसला IOC म्हणजेच Initial Operational Clearance मिळाले.

कोणती कंपनी बनवते ही विमानं?

तेजस विमानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीची निर्मिती आहेत. तेजस Mk-1A ही त्याची सुधारित आवृत्ती आहे. या विमानांची किंमत कॉन्फिगरेशननुसार ठरते. यामध्ये कोणती शस्त्रास्त्रे, इंजिन, रडार आहेत त्यानुसार किंमत निश्चित होते. संख्येनुसार खरेदीची किंमत बदलते, असं साधारणपणे म्हणता येईल.

एका तेजस विमानाची किंमत किती?

2021 च्या करारानुसार सरकारने 83 एमके-1ए प्रकारची 83 तेजस विमानं घेतली होती. या विमानांची एकूण किंमत होती 48 हजार कोटी रुपये. म्हणजेच एका विमानाची किंमत साधारणपणे 580 कोटी रुपये इतकी होते. आकड्यात सांगायचं झालं तर हे एक विमान 5800000000 रुपयांना आहे.

एमके-2 अवृत्तीच्या विकासासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र या विमानांची प्रति विमान किंमत किती असेल हे अद्याप समोर आलेलं नाही. या विमानांचं उड्डाण 2026 मध्ये अपेक्षित आहे.

तेजस स्क्वाड्रनची निर्मिती –

2013 मध्ये IAF साठी 45 स्क्वाड्रन ‘फ्लाइंग डॅगर्स’ ची योजना आखली गेली. जानेवारी 2015 मध्ये IAF ला पहिला सीरिज प्रोडक्शन तेजस देण्यात आला. 1 जुलै 2016 रोजी ‘फ्लाइंग डॅगर्स’ स्क्वाड्रन अधिकृतपणे IAF मध्ये दाखल झाली.

20 डिसेंबर 2019 रोजी तेजसचा नेव्ही व्हेरिएंट यशस्वीरीत्या INS विक्रमादित्यवर उतरले. हा भारतीय नौसेनेसाठी मोठा बदल होता.

जानेवारी 2021 मध्ये भारत सरकारने 48,000 कोटींचा करार मंजूर केला. 73 तेजस Mk1A फायटर, 10 ट्रेनर जेट्स हा भारताच्या लष्करी विमान इतिहासातील सर्वात मोठा स्वदेशी व्यवहार मानला जातो.

Mk1A चे नवे फीचर्स

मार्च 2023 मध्ये HAL ने Mk1A चे उत्पादन सुरू केले. त्यामध्ये खालील अॅडव्हान्सड् फीचर्स देण्यात आले. AESA रडार , इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, मिड-एअर रिफ्यूलिंग हलके वजन, सुधारित अवियॉनिक्स.

दुबई एअर शोमध्ये भारताचे स्वदेशी लढाऊ विमान तेजस उड्डाणादरम्यान क्रॅश (Tejas Crash) झाल्याची धक्कादायक घटना घडली. 42 वर्षांच्या मेहनतीच्या या प्रवासाला एका क्षणात हादरा बसल्याची चर्चा आहे. तेजसच्या कामगिरीमुळे अनेक देश त्याची खरेदी करण्यासाठी तयार होते, मात्र या अपघाताचा भविष्यातील डिफेन्स डीलवर (Defence Deal)परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारतासाठी ही बाब चिंतेची देखील ठरत आहे.

– आकांक्षा देशमुख
– ⁠संवाद सेतू

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.