अखेर भारताच्या लेकींनी रचला इतिहास; रणरागिणींनी विश्वचषकावर कोरलं नाव तर देशभर जल्लोष
भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठा इतिहास रचला आहे. महिला विश्वचषकामध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा किताब पटकावला. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघानं अखेर विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत संघाला 52 धावांनी पराभूत करून भारताच्या महिला संघाने आपला पहिला विश्वचषक जिंकला आहे. मागील अनेक वर्षांपासून महिला भारतीय संघ जे स्वप्न पाहत होता ते अखेर पूर्ण केलं आहे.
या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 298 धावा केल्या. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी दमदार सुरुवात दिली. मंधानाने 45 धावा (8 चौकार) केल्या, तर शेफालीने 87 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यामध्ये तिने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 धावा, जेमिमा रॉड्रिग्स 24 धावांच्या छोट्या पण अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी केल्या.
यानंतर आलेल्या दीप्ती शर्माने 58 धावांची अत्यंत निर्णायक खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघ 298 धावांपर्यत पोहचू शकला. तर या अंतिम सामन्यात फिरकीपटू दिप्ती शर्माने आपल्या 9.3 ओव्हरमध्ये अवघ्या 39 धावा देत तब्बल 5 विकेट घेतल्या. तर शेफाली वर्माने ऐन मोक्याच्या वेळी 2 बळी घेतले. तसंच तिने 7 ओव्हरमध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली. ज्यामुळे द. आफ्रिकेवर बराच दबाव आला.
अखेर स्वप्न साकार झालं !
2005 आणि 2017 मध्ये अधुरं राहिलेल स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघानं स्वप्ननगरीत साकार करून दाखवलं. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने शतकी खेळी केली. तिने भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं होते. पण दीप्तीच्या गोलंदाजीने भारतीय महिला संघाचा ट्रॉफी जिंकण्याचा मार्ग मोकळा केला. आणि शेवटी भारतीय संघाने फायनल बाजी मारत अधुरं स्वप्न साकार केलं.
भारतभर जल्लोष
अंतिम सामना नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर जगभरातील करोडो चाहते टीव्ही आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हा सामना पाहत होते. जेव्हा भारतीय महिला संघाने सामना जिंकून इतिहास रचला तेव्हा मात्र भारतभर जल्लोष करण्यात आला. स्टेडियमच्या बाहेर तर भारत माता की जय, हमारी छोरी छोरोसे कम नहीं, भारताच्या लेकींनी करून दाखवलं असं म्हणत जोरदार जल्लोष केला. तर राजकीय, क्रीडा व कलाकार, अशा अनेक मान्यवरांनी भारतीय महिला टीमचे कौतुक करत अभिनंदन केले.
राजकीय मोहिमांमध्ये Samvad Setu Media ची भूमिका
प्रभावी डिजिटल कम्युनिकेशनद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याची नवी पद्धत.
Explore More