Samvad Setu Media

[gtranslate]

लाल किल्ल्यावर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचा भव्य देखावा

लाल किल्ल्यावर महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचा भव्य देखावा

Ganeshotsav

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या Ganeshotsav च्या देखाव्याला मान मिळणार..!

भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ एक राष्ट्रीय सण नसून देशाच्या विविधतेतील एकतेचं, सांस्कृतिक वैभवाचं आणि लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. दरवर्षी २६ जानेवारी रोजी दिल्लीतील कर्तव्य पथ लाल किल्ला परिसर येथे होणारे प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतं. या संचलनात देशातील विविध राज्ये आपापली संस्कृती, परंपरा, कला आणि सामाजिक ओळख दर्शवणारे देखावे सादर करतात. येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या वतीने ‘Ganeshotsav’ या ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरेचा देखावा सादर करण्यात येणार आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे अधिक जागतिक पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या Ganeshotsav चे पारंपरिक रुप संपूर्ण जगाला कळेल.

Ganeshotsav
गणेशोत्सव परंपरेचा भव्य देखावा

Ganeshotsav केवळ उत्सव नाही, तर ती चळवळ आहे..!

लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला तो तरुणांच्या अंगात राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी. त्यामुळे महाराष्ट्रातील Ganeshotsav ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती एक सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळ आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटिश राजवटीत सार्वजनिक Ganeshotsav ची सुरुवात करून समाजाला एकत्र आणण्याचं प्रभावी माध्यम उभं केलं. घराघरात मर्यादित असलेला गणपतीचा उत्सव त्यांनी सार्वजनिक केला आणि त्यातून समाजप्रबोधन, स्वातंत्र्याची जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवली. हाच ऐतिहासिक संदर्भ या देखाव्यात प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. त्यामुळे या गणेश उत्सवाचा हा देखावा संपूर्ण कार्यक्रमाचं खास आकर्षण बनला आहे. सगळ्यांचं लक्ष या देखाव्याकडे लागलंय.

देखाव्याची संकल्पना आणि सादरीकरण

महाराष्ट्राचा Ganeshotsav देखावा लोककला, परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असेल. या देखाव्यात पारंपरिक गणेशमूर्ती, सजावटीचे मंडप, सामाजिक संदेश देणारी रूपरेषा आणि लोकसहभागाचं दर्शन घडेल. ढोल-ताशांचा गजर, लेझीम, पारंपरिक वेशभूषा, वारली व पाथर्डी शैलीतील कलाकृती यांचा समावेश करून Ganeshotsav चं उत्साही आणि आनंदी स्वरूप देशासमोर मांडण्यात येईल.
या देखाव्यातून Ganeshotsav चा धार्मिक पैलू जितका ठळक असेल, तितकाच त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक संदेशही अधोरेखित केला जाईल. स्वच्छता, पर्यावरणपूरक Ganeshotsav, सामाजिक एकोपा आणि लोकसहभाग यासारख्या आधुनिक मूल्यांचं प्रतिबिंबही या सादरीकरणात पाहायला मिळेल. अशी माहिती सोशल मीडिया वरती प्रसारीत करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचलेय. परंपरेला धक्का न लावताही उत्सवांना अधुंकतेची आणि सामाजिकतेची जोड देता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा देखावा असणार आहे.

प्रजासत्ताक दिनी “महाराष्ट्राच्या लाडक्या बाप्पांचं” दर्शन थेट संचलनात.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख

Ganeshotsav

Ganeshotsav ही महाराष्ट्राची जागतिक ओळख बनली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, नाशिकसह राज्याच्या प्रत्येक भागात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध जाती-धर्म-समुदायातील लोक एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होतात, हीच त्याची खरी ताकद आहे. लाल किल्ल्यावर सादर होणारा हा देखावा महाराष्ट्राच्या या सर्वसमावेशक संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला थेट दिल्लीच्या संचलनात मान मिळाल्याने सर्व गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावर आहे. आता सगळ्यांचेच डोळे या देखाव्यातील बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी आसुसलेले आहेत.

राष्ट्रीय पातळीवरील संदेश

प्रजासत्ताक दिनाच्या मंचावर देखावा सादर होणं म्हणजे केवळ महाराष्ट्राचा गौरव नाही, तर भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं सशक्त दर्शन आहे. हा देखावा देशभरातील प्रेक्षकांना एक महत्त्वाचा संदेश देतो, की भारताची शक्ती ही त्याच्या परंपरा, लोकसंस्कृती आणि सामाजिक ऐक्यात आहे. स्थानिक परंपरा जपत आधुनिक भारत उभा राहत असल्याचं हे सुंदर उदाहरण ठरेल. प्रजासत्ताक दिनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचा हा संदेश म्हणजे लोकशाहीच्या फेट्यात रोवला जाणारा मानाचा तुरा आहे. या देखाव्याच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची, परंपरेची आणि स्वातंत्र्य चळवळीतील सांस्कृतिक योगदानाची जाणीव होईल. लोकमान्य टिळकांचे विचार, समाजासाठी उत्सवाचा वापर आणि सांस्कृतिक एकतेचं महत्त्व हे मूल्य आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आहेत. Ganeshotsav चा देखावा ही प्रेरणा युवकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम ठरेल.

अभिमानाचा क्षण

२६ जानेवारी रोजी जेव्हा लाल किल्ल्यावर महाराष्ट्राचा Ganeshotsav देखावा सादर होईल, तेव्हा तो क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा असेल. राज्याची सांस्कृतिक परंपरा, सामाजिक जाणिवा आणि राष्ट्रीय योगदान देशासमोर मांडण्याची ही सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती केवळ भूतकाळाची आठवण नसून ती आजही जिवंत, गतिमान आणि प्रेरणादायी आहे, हे या देखाव्यातून स्पष्टपणे दिसून येईल.

Ganeshotsav चा हा देखावा म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संगम आहे. जो प्रजासत्ताक दिनाच्या भावनेला खऱ्या अर्थाने साजेसा आहे. संवाद सेतूकडून सर्व गणेशभक्तांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी!

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.