Samvad Setu Media

[gtranslate]

In Bihar assembly election, ruling National Democratic Alliance (NDA) is heading towards a landslide victory

In Bihar assembly election, ruling National Democratic Alliance (NDA) is heading towards a landslide victory

bihar NDA

बिहार विधानसभा निवडणुकीत २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; पुन्हा एनडीएचे सरकार; काँग्रेसला मोठा धक्का !

देशात चर्चेचा विषय असणारी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. सुरुवातीचे कौल आणि समोर आलेले निकाल यावरून एनडीएची बंपर कामगिरी दिसून येत आहे. या निवडणुकीत एनडीएनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या एकूण 243 जागांपैकी 206 जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर महाआघाडीला 30 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. महाआघाडीला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. २०२५ च्या एनडीएच्या विजयानंतर २०१० च्या निवडणूक निकालाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. ही तीच निवडणूक होती, ज्यात भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूने फक्त कमालच केली नाही तर विरोधकांना जबरदस्त झटका दिला होता.

दरम्यान, या विजयामागे फक्त मोठी आश्वासने नाहीत, तर अनेक छोट्या-मोठ्या रणनीतींनी काम केलं आहे. एनडीएचा विजय हा केवळ योगायोग नाही, तर मोठ्या राजकीय मोर्चेबांधणीचा हा परिणाम आहे. बिहारची राजकीय दंगल नेमकी कशी झाली, कोणी बाजी मारली , कोणती रणनीती यशस्वी ठरली. हे सर्व आपण आजच्या लेख मध्ये पाहणार आहोत.

बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती –

बिहारच्या राजकारणात २०१० च्या काळात लालू प्रसाद यादव सक्रीय होते. तेजस्वी यादव राजकारणाचे धडे गिरवत होते. सध्या लालू यादव यांचे वाढते वय, इतर आरोप आणि शिक्षेमुळे ते राजकारणात फारसे सक्रीय नव्हते. निवडणुकीची कमान तेजस्वी यादव यांच्याकडे आहे परंतु जे निकाल सध्याच्या निवडणुकीत समोर आलेत ते पाहून २०१० ची आठवण ताजी झाली.

बिहारमध्ये २०१० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले असता तेव्हाही नितीश कुमारांची जेडीयू एनडीएचा भाग होती. तेव्हा जागावाटपात जेडीयू १४१ तर भाजपा १०२ जागांवर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत बिहार भाजपाचा चेहरा सुशील कुमार मोदी होते, ज्यांचे निधन झाले आहे. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने १६८ तर रामविलास पासवान यांच्या एलजेपीने ७५ जागांवर निवडणूक लढली होती. काँग्रेसने स्वबळावर २४३ जागा लढवल्या होत्या.

एनडीएच्या ‘कुशल नेतृत्व

एनडीएने निवडणुकीच्या सुरुवातीलाच नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. स्वतः पंतप्रधानांनी सुरुवातीच्या प्रचारसभांमध्ये नीतीश यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एनडीएला या कुशल नेतृत्वाचा मोठा फायदा झाला. व जोरदार प्रचाराच्या जोरावर एनडीएने बिहार विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरस्ट्रोक

बिहारमध्ये जंगलराजला थारा नाही अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रचार केला. तसेच विरोधकांपेक्षा एनडीए किती भक्कम आहे हे जनतेला दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे एनडीएला सत्ताविरोधी लाटेच्या दबावातून बचाव मिळाला. तर “डबल इंजिन”च्या अपीलमुळे मतदारांच्या मनात हा विश्वास दृढ झाला की विकास आणि स्थैर्यासाठी केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असणे आवश्यक आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोलल जात आहे.

महाआघाडीत रस्सीखेंच

महागठबंधनमध्ये जागा वाटपासाठी मोठी रस्सीखेंच सुरु होती. तसंच उमेदवार जाहीर करण्यात विलंबही लागला होता. यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. तसच आघाडीत अंतर्गत मदभेद असल्याचंही समोर आलं. अनेक जागांवर नाराज उमेदवारांनी बंडखोरी केली. यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. तसच आघाडीत अंतर्गत मदभेद असल्याचंही समोर आलं. ज्याचा थेट फायदा एनडीएच्या उमेदवारांना झाला.

एनडीएकडून योग्य वेळी उमेदवारांची घोषणा

एनडीएने आपली तिकीट वाटप प्रक्रिया वेळेत आणि संघटित पद्धतीने पूर्ण केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला. जनतेतही सकारात्मक संदेश गेला. तिकीट वाटपात जातीय संतुलनाचे पूर्ण भान ठेवले गेले. एनडीएमध्ये ‘चिरागचं पुनरागमन आणि वेळेचे व्यवस्थापन’ करण्यात आलं. चिराग पासवान यांना आघाडीत सामील करण्याची प्रक्रिया जरी लांबली, तरी एनडीएने ती निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच अंतिम केली. यावरून दिसते की एनडीए नेतृत्वाने आपली सर्वात मोठी आव्हानेही वेळेत ‘मॅनेज’ केली आणि प्रचार सुरू होण्यापूर्वीच आघाडीचं चित्र स्पष्ट केलं.

एनडीएला महिला मतदारांचा पाठिंबा –

 नोव्हेंबर २०२३ पासून १३ राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. यापैकी १० राज्यांमध्ये महिलांसाठी रोख योजना लागू करण्यात आल्या होत्या किंवा त्यांचे आश्वासन देण्यात आले होते. या १० पैकी नऊ राज्यांमध्ये ही योजना प्रभावी ठरली, ज्याचा स्ट्राइक रेट ९०% होता.
महिला मतदारांमध्ये हा ट्रेंड बनला आहे की त्या फक्त त्यांनाच मतदान करतील जो त्यांच्यासाठी योजना आणेल किंवा त्याबद्दल बोलेल.
महिला मतदारांचे महत्त्व ओळखून, नितीश कुमार सरकारने महिला रोजगार योजना सुरू केली. निवडणुकीपूर्वी, १.२१ कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. लोकांनी या योजनेला “दस हजारी” असे टोपणनाव दिले.
व्होट व्हायब या सर्वेक्षण संस्थेनुसार, ४८.५% महिलांनी एनडीएला मतदान केले. शिवाय, ३७% महिलांनी नितीश कुमार यांच्या १०,००० रुपयांच्या योजनेला चांगला निर्णय मानला.

महाआघाडी मागे का पडली ?

निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबर रोजी निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी, एनडीएने त्यांच्या जागावाटपाच्या व्यवस्थेची घोषणा केली. दरम्यान, महाआघाडीने अधिकृतपणे जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला नाही. महाआघाडीत पसंतीच्या जागांवरून वाद सुरूच राहिले. परिस्थिती इतकी बिकट झाली की महाआघाडीतील वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आठ जागांवर आमनेसामने आले. त्यांनी एकमेकांशी लढा दिला.

सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यांवरून वाद झाला. तेजस्वी यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि मुकेश साहनी यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला, परंतु काँग्रेसला हे मान्य नव्हते. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी महाआघाडीची पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये तेजस्वी यांना मुख्यमंत्री चेहरा आणि साहनी यांना उपमुख्यमंत्री चेहरा घोषित करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत एनडीएमध्ये अनिश्चितता कायम होती. तथापि, भाजप नेत्यांनी असा युक्तिवाद केला की एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. या सर्व गोष्टींचा फटका महाआघाडीला बिहार निवडणुकीत बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी –

“हा केवळ एनडीएचा विजय नाही. हा लोकशाहीचाच विजय आहे. यामुळे निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास वाढला आहे. गेल्या काही वर्षांत, विशेषतः उपेक्षित गटांमध्ये वाढलेले मतदान हे निवडणूक आयोगासाठी एक महत्त्वपूर्ण यश आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“जेव्हा मी जंगल राज आणि कट्टा सरकारबद्दल बोलायचो, तेव्हा राजद पक्षाने कोणताही आक्षेप घेतला नाही. तथापि, त्यामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली. आज, मी पुन्हा सांगू इच्छितो की कट्टा सरकार कधीही बिहारमध्ये परतणार नाही,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून एनडीएने पुन्हा सरकार स्थापन केल. यामध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरला आहे. तर महा आघाडीला मोठा फटका बसला आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेस पिछाडीवर गेला. तर या निकालानंतर तेजस्वी यादव यांना आता आपल्या पक्षाची संघटन क्षमता वाढवावी लागेल आणि भविष्यात मित्रपक्षांची निवड अधिक विचारपूर्वक करावी लागणार आहे. तर दुसरीकडे एनडीएकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे.

– आकांक्षा देशमुख
– ⁠संवाद सेतू

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.