स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट Balasaheb Thackeray यांच्या जन्मशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन..!
वाचा आणि शांत बसा..!
हे वाक्य म्हणजे Bal Thackeray यांची शैली, विचारसरणी याचं प्रतीक आहे. झोपलेल्या मराठी माणसाला झोपेतून जागं करण्यासाठी Balasaheb Thackeray म्हणाले होते वाचाआणिशांतबसा..! पण मुळात आपल्यावर आणि मराठी माणसावर होणारा अन्याय बघून Balasaheb Thackeray कधीच शांत बसले नाहीत. त्यांनी अन्यायाच्या, असत्याच्या आणि जुलुमशाहीच्या विरोधात आवाज उठवला. खरं तर त्यांनी आवाज उठवला म्हणून ते Bal Thackeray चे Balasaheb Thackeray झाले.
कधी कधी आपल्याला मिळालेला नकार हाच आपल्या आयुष्यातील पॉझिटिव्ह पॉइंट असतो. Balasaheb Thackeray यांच्या आयुष्यातील एक असाच टर्निंग पॉइंट म्हणजे त्यांच्या व्यंगचित्रांवर आलेली बंदी. कदाचित ती बंदी नसती, तर महाराष्ट्राला Balasaheb Thackeray हे नेतृत्व मिळालंच नसतं आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरण खूप वेगळं असतं.

लहानपणापासूनच Bal Thackeray वेगळे होते. वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून त्यांना विचारांची शिस्त, समाजाकडे पाहण्याची तीक्ष्ण दृष्टी, स्पष्टवक्तेपणा आणि प्रभावी भाषणशैलीचा वारसा मिळाला होता. यालाच पुढे ठाकरेशैली असं नाव पडलं. मात्र, त्यांचे गुण बघून ते पुढे राजकारणात जातील, असं त्या काळात कुणालाच वाटलं नव्हतं. कारण त्यांचं मन रमत होतं ते व्यंगचित्रांमध्ये.
त्यांचं मन रमत होतं चित्रकलेमध्ये. समाजावर मार्मिक भाष्य करण्याची क्षमता आणि उपरोधाची धार हे गुण Bal Thackeray यांच्यात लहानपणापासून होते. क्रिकेट, सिनेमा हे त्यांचे आवडीचे विषय. या विषयांवर Balasaheb Thackeray कोणाशीही कितीही वेळ भरभरून गप्पा मारायचे. निरीक्षण करणं आणि त्यातून काहीतरी वेगळं मांडणं त्यांना आवडायचं. त्यामुळे सुरुवातीचा त्यांच्यातला राजकारणी नाही तर कलाकार जागा झाला होता..!
एक व्यंगचित्र काढायला दिलं असतं तर कदाचित महाराष्ट्राला Balasaheb Thackeray मिळालेच नसते.
त्याचं झालं असं, Balasaheb Thackeray तेव्हा फ्रीप्रेसजर्नल या इंग्रजी वृत्तपत्रात राजकीय व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. ते व्यंगचित्रांमधून राजकारणातील विसंगती, सत्तेचा दुटप्पीपणा आणि सामान्य मराठी माणसावर होणारा अन्याय अतिशय नेमकेपणाने आणि प्रकर्षाने मांडत होते. शब्दांपेक्षा चित्र अधिक प्रभावी ठरतं, हे Balasaheb Thackeray यांनी तेव्हाच दाखवून दिलं होतं.
याच काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर धरला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू होता. हा मुद्दा केवळ राजकीय नव्हता, तर मराठी अस्मितेचा प्रश्न होता. Balasaheb Thackeray यांनी या विरोधात आपल्या व्यंगचित्रांतून सरकारवर थेट हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यांची चित्रं लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली. मग सहाजिकच प्रेसवर राजकीय दबाव वाढला. विरोध कमी करण्याचे आदेश आले. आणि अखेर तो क्षण आला—प्रेसकडून Balasaheb Thackeray यांच्या व्यंगचित्रांवर बंदी घालण्यात आली. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला. जरतुम्हालामाझीचित्रंपटतनसतीलतरमाझ्याचित्रांनातुम्हीमान्यनाही, असं Balasaheb Thackeray यांनी ठणकावून सांगितलं आणि नोकरी सोडली.आणि १९६० साली ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू झालं. विशेष म्हणजे या साप्ताहिकाचं नाव स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवलं होतं. ‘मार्मिक’ म्हणजे बोचरे, नेमके आणि विचार करायला लावणारे भाष्य जे या साप्ताहिकाचं वैशिष्ट्य ठरलं.

अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला, पण प्रश्न संपले नाहीत. विशेषतः मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय, रोजगारातील दुजाभाव आणि सांस्कृतिक उपेक्षा सुरूच होती. Balasaheb Thackeray यांनी ‘मार्मिक’ मधून या प्रश्नांना वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना त्यांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातूनच जाब विचारला.
व्यंगचित्र नाकरलं आणि घडले हिंदूहृदयसम्राट
पण काही काळानंतर Balasaheb Thackeray यांच्या लक्षात आलं की केवळ चित्रं पुरेशी नाहीत. मराठीद्वेष आणि मराठी माणसांवरील अन्याय हा संघटित लढ्यानेच थांबवता येईल. आणि इथूनच जन्म झाला एका राजकीय-सामाजिक चळवळीचा जन्म झाला शिवसेनेचा. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेने चळवळ सुरू केली. आंदोलनांनी जोर धरला. मराठी पाट्यांचं आंदोलन असो, किंवा *‘हटाव लुंगी, बजाओ पुंगी’*सारखी घोषवाक्यं असोत—या सगळ्या आंदोलनांतून मराठी माणूस एकवटला. नेतृत्व स्पष्ट होत गेलं. आणि Bal Thackeray हे नाव हळूहळू Balasaheb Thackeray बनलं.
पुढील काळात Balasaheb Thackeray यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. आणि त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट हे नाव जोडलं गेलं. त्यांची भाषणं केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात चर्चेत राहू लागली. आणीबाणीच्या काळात घेतलेली भूमिका, फक्त मराठी आहेत म्हणून प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी दिलेला पाठिंबा, पाकिस्तानी खेळाडूंवर घातलेली बंदी या सगळ्यामुळे Balasaheb Thackeray हे व्यक्तिमत्त्व राजकारणाच्या चौकटीपलीकडचं ठरलं.म्हणूनच Balasaheb Thackeray यांना मानणारा मराठी माणूस आज प्रत्येक पक्षात दिसतो. त्यांच्या विचारांशी सहमत असो वा नसो, त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कोणीही नाकारू शकत नाही. आणि म्हणूनच आज कोणत्याही राजकीय पक्षाला हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना Balasaheb Thackeray यांची आठवण काढावीच लागते.

व्यंगचित्रकारापासून हिंदूहृदयसम्राटापर्यंतचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचा भाग आहे. अख्ख्या भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या महानेत्याला हिंदूहृदयसम्राट Balasaheb Thackeray यांना संवादसेतूकडून विनम्र अभिवादन.
जय हिंद, जय महाराष्ट्र.