Samvad Setu Media

[gtranslate]

End Of An Era: Mumbai’s Iconic Red Double-Decker Buses To Roll Off The Streets After 80 Years Of Service

End Of An Era: Mumbai’s Iconic Red Double-Decker Buses To Roll Off The Streets After 80 Years Of Service

red double-decker buses

Mumbai’s Red Double Decker Buses off On roads

मुंबईतील डबल डेकर बस इतिहासजमा, आठवणी मात्र कायम !

आपल्या जीवन प्रवासात काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्यापासून दूर गेल्यावर उरतात त्या फक्त त्यांच्या आठवणीच. अशाच प्रकारची एक सुंदर गोष्ट आता इतिहासजमा होत आहे. कारण मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या डबल डेकर बसच्या आता फक्त आठवणीच उरल्या आहेत. डीझेस डबल डेकर बसच्या प्रवासाचा शेवट नुकताच झाला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आता डबल डेकर लालपरी दिसणार नाहीय.

आता मुंबईच्या रस्त्यावरून डबल-डेकर बस गायब झालेली आहे. एकेकाळी मुंबईची ओळख म्हणून या डबल-डेकर बसेसकडे पाहिलं जायचं. ब्रिटीश काळापासून धावणाऱ्या या बसेस आता धावताना दिसत नाहीत. डिझेलवर चालणाऱ्या या डबल-डेकर बसेस १५ सप्टेंबर २०२३ पासूनच मुंबईत पूर्णपणे बंद झाल्या आहेत. यावेळी मुंबईकर भावुक देखील झाले होते.

डबल डेकर बसच्या प्रवासाची सुरुवात !

मुंबईची ओळख बनलेल्या डबल-डेकर बस 88 वर्षांपासून रस्त्यावर धावत होत्या. 1937 मध्ये ब्रिटिशांनी मुंबईत पहिली डबल-डेकर बस चालवली. तेव्हापासून ते वाहतुकीचे महत्त्वाचे साधन बनले होते. डबल-डेकर बसेसव्यतिरिक्त, ओपन-डेक डबल-डेकर बस देखील आहेत. पूर्वी यातून प्रवासीही प्रवास करत असत, मात्र नंतर त्याचे रूपांतर पर्यटक बसमध्ये करण्यात आले.

90 च्या दशकाच्या सुरुवातीस, बेस्टच्या ताफ्यात सुमारे 900 डबल-डेकर बस होत्या. मात्र त्यानंतर त्यांची संख्या कमी होत गेली. डबल-डेकर बसेसचा देखभाल आणि चालवण्याचा खर्च जास्त असल्याने 2008 पासून ताफ्यात नवीन बसेसचा समावेश बंद करण्यात आला. आता या डबल-डेकर बसेसची जागा इलेक्ट्रिक बसने घेतली जाणार आहे. या बसही डबल-डेकर असतील आणि त्यांचा रंग लाल आणि काळा असेल. तर जुन्या डबलडेकर बसेस फक्त लाल रंगाच्या होत्या.

डबल डेकर बसचा इतिहास !

200 वर्षांपूर्वी, पॅरिसमध्ये घोडागाडी चालवणाऱ्या स्टॅनिस्लास बौद्रीने अधिक प्रवासी बसण्यासाठी घोडागाडी दुमजली बनवली. 1828 मध्ये त्यांची दोन मजली घोडागाडी पॅरिसच्या रस्त्यावर धावू लागली. दोन वर्षांनंतर, 1830 मध्ये, ब्रिटनच्या गोल्डवर्थी गर्ने आणि वॉल्टर हॅनकॉक यांनी स्टीम इंजिन असलेली बस सुरू केली. काही वर्षांनंतर जॉर्ज शिलीबीर या आणखी एका इंग्रजाने ओम्नी बस या नावाने लंडनच्या रस्त्यावर डबल-डेकर बसेस आणल्या. इंजिन-चालित डबल-डेकर बस लंडनच्या रस्त्यावर 1920 च्या दशकात प्रथमच दाखल झाल्या. मुंबईत 1937 पासून डबल डेकर बसेस धावत आहेत.

1937 साली मुंबईत धावलेल्या डबल-डेकर बसमध्ये एकावेळी 58 प्रवासी प्रवास करू शकत होते. तर सिंगल डेकर बसमधून केवळ ३६ प्रवासी प्रवास करू शकत होते. वाढती लोकसंख्या आणि अरुंद रस्ते लक्षात घेऊन डबल-डेकर बसेस बनवल्या जाऊ लागल्या. त्यांची लांबी 9 ते 12 मीटर आहे. यामध्ये एकावेळी 60 ते 120 प्रवासी प्रवास करू शकतात.

प्रवाशांची आवड लालपरी –

लग्न झाल्यावर, पहिले काही दिवस, टॅक्सीची चैन करून झाली की नवीन जोडप्यांसाठी, डबल डेकर बसची वरच्या मजल्यावरील अगदी पुढची जागा म्हणजे, गार वारा खात, आपल्या संसाराची स्वप्ने रंगवत प्रवास करण्यासाठी एकदम परफेक्ट जागा.
दुमजली बस म्हणजे दोन कंडक्टर आलेच. वरच्या मजल्यावर उभ्याने प्रवास करण्याची परवानगी नसल्यामुळे, वरच्या कंडक्टरला बेलचे विशिष्ट टोले देऊन, खालच्या मजल्यावरील कंडक्टरला संदेश द्यावा लागत असे, म्हणजे अजून वरचे प्रवासी उतरत असतील तर टण टण असा आवाज काढायचा, सगळे प्रवासी खाली गेले की, एकच टोला आणि वर सगळं हाऊसफुल्ल असेल, तर टीण टीण टीण असं पाच सहा वेळा वाजवायचं. अशी ती दोन कंडक्टरमध्ये सांकेतिक घंटाभाषा असे.

मुंबई शहरातील रस्त्यांवर, एके काळी खाजगी एसी गाडी शोधावी लागत होती, आज नॉन एसी गाडी शोधूनही सहज सापडेल की नाही शंका आहे. मुंबईची जीवन वाहिनी, लोकल ट्रेन सुद्धा आपले जुने मोकळ्या ढाकळ्या सताड उघड्या खिडक्या दरवाजांचे रूप पालटून एसी लोकलच्या स्वरूपात धावण्यासाठी सिद्ध होऊ लागली आहे. ब्रिटिश काळापासून मुंबईकरांना शहरांतर्गत प्रवासाची सेवा देणारी बीईएसटी- बेस्टदेखील आधुनिक स्वरूपात आरामदायी बस सेवा देण्याच्या प्रयत्नात आहे.

बेस्टने वातानुकूलित बससेवा सुरू केली असून आता बेस्टच्या आयकॉनिक डबल डेकर बसदेखील वातानुकूलित होणार आहेत. या विकासाच्या रेट्यात मुंबईची ओळख असणारी आणि ब्रिटिश काळापासून शहाराच्या रस्त्यांवर दिमाखात फिरणारी नॉन एसी डबल डेकर बससेवा मात्र बंद झाली आहे. १५ सप्टेंबरपासून ती शहरवासीयांचा कायमचा निरोप घेणार आहे. मुंबईकरांच्या अनेक पिढ्यांच्या आठवणींत त्या नक्कीच कायमस्वरूपी विराजमान होतील.

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.