Samvad Setu Media

[gtranslate]

Hanuman Chalisa Makes History: First Indian YouTube Video to Cross 5 Billion Views

Hanuman Chalisa Makes History: First Indian YouTube Video to Cross 5 Billion Views

Hanuman Chalisa

Hanuman Chalisa: YouTube वर 5 अब्ज व्ह्यूजचा सुवर्णअंक; भक्ती, संगीत आणि डिजिटल युगाचा संगम

 
भारताच्या सांस्कृतिक स्मरणभांडारात काही गाणी ताऱ्यांसारखी झळकतात. काळ बदलला, माध्यमं बदलली तरी त्यांचा तेजोमय प्रवास थांबत नाही. T-Series च्या “Hanuman Chalisa” यांनी YouTube वर 5 अब्ज (500 कोटी) व्ह्यूजचा टप्पा पार करत जागतिक पातळीवर नवा इतिहास रचला, आणि भारतीय कंटेंटने डिजिटल विश्वातली आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. हा टप्पा केवळ एका व्हिडिओची कामगिरी नाही तर तो आहे भक्तीभाव, संगीत आणि आधुनिक ऑनलाइन संस्कृतीचा लोभस मिलाप. चला तर यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहूया.
 
‘श्री हनुमान चालीसा’ हा YouTube वर ५ अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवणारा पहिला भारतीय व्हिडिओ बनला आहे. भारतातील सर्वाधिक पाहिले गेलेल्या व्हिडिओंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ २ अब्ज व्ह्यूजपर्यंतही पोहोचलेला नाही. दरम्यान, ‘श्री हनुमान चालीसा’ हा व्हिडिओ ५ अब्ज पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ १० मे २०११ रोजी रिलीज झाला होता आणि त्यात टी-सिरीजचे दिवंगत गुलशन कुमार यांचा समावेश आहे. 
 
१४ वर्षे जुना हा व्हिडिओ अजूनही खूप लोकप्रिय आहे. हरिहरनचा आवाज आणि ललित सेन यांचे संगीत असलेले हे व्हिडिओ अनेक बॉलीवूड गाण्यांना मागे टाकत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात YouTube वर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक व्ह्यूज हिंदी गाणे नाही तर पंजाबी गाणे आहे.

 

१) Hanuman Chalisa म्हणजे काय? 

 
१६व्या शतकात संत तुलसीदासांनी रचलेली ‘हनुमान चालीसा’ ही केवळ स्तुतीमंत्रांची मालिका नाही. तर ते आहे श्रद्धेचं सुरक्षाकवच, भक्तीचा स्थिर ध्रुव, आणि संकटकाळात उभा राहणारा आध्यात्मिक आधारस्तंभ आहे. 
भारतीय घराघरात वाजणारं, मंदिरे–घाट–सोहळ्यांमध्ये निनादणारं हे स्तोत्र अनेक पिढ्यांच्या भावविश्वाचं केंद्र आहे. YouTube वर या आध्यात्मिक शक्तीला डिजिटल पंख लाभताच तिचा प्रभाव विश्वभर उलगडला.
 

२) 2011 मध्ये अपलोड झालेला T-Series चा व्हिडिओ 

 
T-Series Bhakti Sagar ने 2011 मध्ये हा व्हिडिओ YouTube वर अपलोड केला. या आवृत्तीत गुलशन कुमार यांचा आवाज, सौम्य, शांत आणि खोलवर प्रभाव टाकणारी गायकी, साधं, पण भक्तिप्रधान स्क्रीन प्रेझेंटेशन या सर्वांनी मिळून ‘हनुमान चालीसा’च्या पारंपरिक रूपाला डिजिटल स्वरूपात नवी ऊंची दिली. हा व्हिडिओ सुरूवातीला मंदगतीने वाढत गेला, पण नंतर त्याने एक वेगळीच उंचभरारी घेतली.
 

३)  व्हायरल होण्यामागचे कारण काय ? 

 
हे गाणं 5 अब्ज व्ह्यूजपर्यंत पोहोचणं योगायोग नव्हता. त्यामागे अनेक घटकांचे सुंदर संयोजन आहे. 
 

– आध्यात्मिकता + सुलभ डिजिटल पोहोच

 
YouTube मोफत उपलब्ध असल्याने जगभरातील लोकांसाठी हे भजनी गीत अगदी सहज उपलब्ध. भक्ती जेव्हा एका क्लिकवर मिळते तेव्हा तिचा प्रसार वेगाने होतो.

 

– हनुमान भक्तांचा प्रचंड समुदाय

 
भारतासह नेपाळ, मॉरिशस, फिजी, त्रिनिदाद–टोबॅगो, सुरिनाम, अमेरिका- यूकेमधील भारतीय डायस्पोरा. हनुमान भक्तांचा मोठा समुदाय हे गीत सातत्याने ऐकतो, सण–उत्सवांमध्ये वाजवतो.

 

– लोकांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग

 
अनेक लोकांसाठी ‘हनुमान चालीसा’ ही
•सकाळची प्रार्थना
•प्रवासात ऐकायचं मंत्रगीत
•कामात लक्ष केंद्रित करण्याचं साधन
 
दररोज लाखो लोक हा व्हिडिओ पुन्हा–पुन्हा ऐकतात. त्यामुळे Views चक्राकार पद्धतीने वाढत गेले.
 

– शांत गायकी आणि सोपी प्रस्तुती

 
गुलशन कुमार यांचा आवाज अतिशय साधा पण मनात उतरणारा. ड्रामॅटिक इफेक्ट नसूनही त्या आवाजात असलेली भक्तीरूप ताकद हे गाणं कायम ऐकू वाटतं.
 

– Lockdown काळातील प्रचंड उछाल

 
2020 च्या लॉकडाउन दरम्यान लोक मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक व्हिडिओंकडे वळले. त्या काळात या व्हिडिओने लाखो, कोट्यवधी नवे व्ह्यूज मिळवले.
 
 

४)जागतिक स्तरावरचा प्रभाव

 
• YouTube वरील कोणत्याही भारतीय व्हिडिओला मिळालेले सर्वाधिक व्ह्यूज
• जागतिक स्तरावरही हे व्हिडिओ टॉप संगीत व भक्तीगीतांपैकी एक
• T-Series च्या जागतिक लोकप्रियतेला आणखी बळ
• भारतीय सांस्कृतिक सामग्रीला मिळालेला अनन्य सन्मान
 
अनेक जागतिक संगीतप्रेमींनीही “इटस् सो कॅल्मिंग”, “I don’t understand the language but I love the vibe” अशा प्रतिक्रिया देऊन आपली पसंती व्यक्त केली.
 
या गाण्याचा डिजिटल प्रवास आपल्याला दाखवतो की, जर भावना शुद्ध असते, सुरांना भक्तीचा सुवास असतो आणि शब्दांना शतकांची परंपरा लाभलेली असते. तर ते सर्जन कोणत्याही काळात प्राचीन किंवा डिजिटल लोकांच्या मनात जागा निर्माण करते. आज ‘हनुमान चालीसा’ YouTube वर अब्जावधी वेळा निनादत आहे. उद्या कदाचित आणखी कुठल्या प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी हृदयात ध्वनित होत राहील.
 
5 अब्ज व्ह्यूज म्हणजे फक्त एक आकडा नाही तर तो आहे. भारतीय सांस्कृतिक वारशाची नवी डिजिटल गाथा. हनुमानाच्या शक्तीवरचा विश्वास आणि भक्तीचा नाद डिजिटल विश्वातही तितकाच ताकदीने प्रतिध्वनित होऊ शकतो, याचा सुंदर पुरावा आहे. 
 
विशेष म्हणजे, लॉकडाउनच्या काळात आध्यात्मिक व्हिडिओंची मागणी प्रचंड वाढली आणि त्याचा सर्वाधिक फायदा ‘हनुमान चालीसा’ला झाला. जगभरातील भारतीय समुदायानेही या व्हिडिओला मोठा पाठिंबा दिला.
 
‘Hanuman Chalisa’ चा हा विक्रम केवळ आकड्यांचा खेळ नाही तर तो भारतीय सांस्कृतिक वारसा, भक्तीभाव आणि डिजिटल युग यांचा प्रभावी संगम आहे. आगामी काळात हे गाणं आणखी नवनवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.