भारतीय क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाने स्वतःचा विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय का घेतला ?
महाराष्ट्रातील सांगली येथे जन्मलेली मराठी तरुणी स्मृती ही भारताची सर्वात विश्वासार्ह आणि सुसंगत फलंदाज मानली जाते. आपल्या मोहक टाइमिंगसाठी आणि कव्हर-ड्राईव्हसाठी ओळखली जाणारी स्मृतीने १६व्या वर्षी भारताकडून पदार्पण केले. तडफदार पण सुसंस्कृत खेळशैली, सातत्य, आणि शांत स्वभाव या सर्व गुणांमुळे स्मृती मंधना आज लाखो चाहत्यांची आवडती क्रिकेट आयकॉन झाली आहे.
करीयरमध्ये यशस्वी टप्पा पार केल्यानंतर आता स्मृती लग्न बंधनात अडकणार होती. तिच्या लव्ह लाईफ बद्दल नेहमी चर्चा सुरू होत्या. अखेर ती लग्न बंधनात अडकणार होती. मात्र असे काही झाले की तिने विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पाहुयात नेमक काय आहे कारण ?
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचा सांगलीत विवाह सोहळा होणार होता. त्यासाठी मोठ्य थाटात तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हळद, संगीत नाईट असे वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. परंतु या लग्नाआधीच मोठे अघटित घडले आहे. स्मृती मानधनाच्या वडिलांना लग्नाच्या काही तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर वडिलांची प्रकृती लक्षात घेता स्मृती मानधना हिने आपले लग्न पुढे ढकलले आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना स्मृतीच्या लग्नाच्या काही तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला आहे. लग्नाच्या मुहूर्ताच्या अवघ्या काही तास अगोदर ही घटना घडली आहे. श्रीनवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थि असल्याचे सांगण्यात आले आहे.
श्रीनिवास मानधना यांची सकाळीच प्रकृती बिघडली होती –
श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर स्मृतीचे मॅनेजर मित्र तोहीन मिश्रा यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीबाबत तसेच नेमके काय घडले, याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले आहे. ‘आज सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली होती. आम्हाला वाटलं बरी होईल. त्यामुळे आम्ही थोडावेळ थांबलो. त्यानंतर त्यांची तब्येत अधिक बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्मृतीचा वडिलांवर जीव आहे. त्यामुळे तिने जोपर्यंत वडील बरे होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही असे ठरवले आहे, अशी माहिती तोहीन मिश्रा यांनी सांगितले आहे.
पाहुण्यांना घरी जाण्यास सांगितले-
आपल्या वडिलांची प्रकृती लक्षात घेता स्मृती मानधना हिने आपले लग्न पुढे ढकलले आहे. वडिलांची प्रकृती चांगली झाल्यानंतरच पुन्हा विवाह सोहळा पार पाडण्यात येईल, असा निर्णय तिने घेतला आहे. त्यामुळेच सर्व पाहुण्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.
तर दुसरकीडे स्मृती मानधानाचे कुटुंबीय सध्या श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहेत. यासह डॉक्टरांनीही त्यांची तब्येत ठिक होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बरी होईपर्यंत लग्न पुढे ढकललं आहे. अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे.
2019 पासून प्रेम, आता विवाहबद्ध –
– स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होतं, आणि तो रोमँटिक क्षणही व्हायरल झाला होता. यांचा अजून एक रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं तेनू लेके मैं जावांगा… या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत होते.
क्रिकेट करिअर –
स्मृती मंधना ही फक्त तिच्या व्यक्तिविषयामुळेच नाही, तर तिच्या क्रिकेट क्षमतेमुळेही मोठ्या स्तरावर ओळखली जाते. तिच्या करिअरमधील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती पाहूया.
– ती अतिशय लहान वयात महाराष्ट्राच्या अंडर-१५ संघात निवडली गेली; नंतर अंडर-१९मध्येही स्थान मिळालं.
– अंडर-१९ युगातच ती एका लिस्ट A सामना दरम्यान गुजरात अंडर-१९ संघाविरुद्ध दोनशे रन बनवणारी पहिली भारतीय महिला बनली होती.
– तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ती अनेक दशकातल्या सर्वोच्च क्षणांना गाठली आहे.
– ICC ODI Player of the Year: २०२४ मध्ये तिने ICC महिला ODI Cricketer of the Year पुरस्कार दुसऱ्यांदा जिंकला.
– Wisden: २०२५ मधील Wisden क्रिकट अल्मनॅकमध्ये तिला “Leading Women’s Cricketer in the World” म्हणून प्रतिष्ठित मान मिळाला आहे.
– तिच्या २०२४ मधील कामगिरीत तीने वर्षभरात – 1659 आंतरराष्ट्रीय धावा मिळवल्या, जे एक स्त्री क्रिकेटमध्ये मोठे महत्त्वाचे आकडे आहे.
रिकॉर्ड्स आणि ठळक कामगिरी-
– २०२४ मध्ये ODI मध्ये 747 धावा (13 इन्निंग्जमध्ये) केल्या होत्या, आणि 4 शतकं झळकवली होती.
– तिच्या टेस्ट कारकिर्दीत तिने दाक्षिण आफ्रिकाविरुद्ध एक शानदार 149 रनांची पारी खेळली.
– तिच्या पातळीवर ती आक्रमक पण शिस्तबद्ध खेळाडू आहे — Wisden मध्ये तिच्या आत्मचिंतनाबद्दल उल्लेख केला गेला आहे, की तिने “दीर्घ इन्निंग खेळण्याची सवय पुन्हा अंगिकारली” आहे.
– तिच्या कामगिरीमुळे भारताची महिला संघावरून खूप विसंबण आहे, कारण ती विविध फॉर्मॅटमध्ये प्रामुख्याने भारतीय टॉप ऑर्डर उघडते.
4. 2025 मधील महत्त्वाचे टप्पे –
– तिने 2025 मध्ये एका ट्राय-नेशन सीरिजमध्ये (श्रीलंका ट्राय-नेशन) उत्तम कामगिरी केली होती.
– तिच्या विमोचनानंतर चाहत्यांकडून तिच्या आयुष्यातील हे भावनिक आणि व्यावसायिक संयोग फारच स्वागतार्ह आहे.
– आकांक्षा देशमुख
– संवाद सेतू