Office Romances made India Rank Second in world.
ऑफिस अफेअरमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर; धक्कादायक माहिती आली समोर
भारत देश सध्या सर्वच गोष्टींमध्ये अग्रेसर आहे. कोणत्याही गोष्टीत मागे न राहणारा आपला भारत देश प्रेम प्रकरणांमध्ये कसा काय मागे राहणार आहे. एरवी ऑफिस अफेअरची फक्त चर्चा असायची, आता मात्र हीच चर्चा सत्यात उतरली आहे.
ऑफिसमधील प्रेमप्रकरणांची संख्या वाढत चालल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या बाबतीत भारतीय कर्मचारी असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे. चला तर मग पाहूयात नेमकी काय माहिती समोर आली आहे.
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण व्यावसायिक जीवनात, ऑफिस हे फक्त काम करण्याचे ठिकाण राहिलेले नाही. तासन्तास एकत्र काम करताना सहकाऱ्यांमध्ये भावनिक बंध निर्माण होणे हे सामान्य होत चालले आहे. कधीकधी ही नैसर्गिक जवळीक कालांतराने मैत्रीपासून प्रेमसंबंधांपर्यंत वाढू शकते. मनोरंजक म्हणजे, अशा ऑफिस रोमान्सना हळूहळू जगभरात मान्यता मिळत आहे. भारतीय कर्मचाऱ्यांनी या संदर्भात एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०% भारतीयांनी कधी ना कधी सहकर्मचाऱ्यांसोबत रिलेशन ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे. एशली मॅडिसन या सिक्रेट नातेसंबंधांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्लॅटफॉर्ममधील युगोव्हच्या सहकार्याने जगातील ११ देशांमध्ये हा रिसर्च केला. यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
११ देशांमधील एकूण १३,५८१ प्रौढ व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला असून भारतीयांमध्ये ऑफीसमध्ये रिलेशनशिप मोठ्या प्रमाणात आढळतात. मेक्सिकोमध्ये हे प्रमाण ४३ टक्के आहे, तर भारतात ४० टक्के असल्याचे दिसले. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा सारख्या देशांत हे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. विशेष बाब म्हणजे, पुरुषांनी महिलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात सहकर्मचाऱ्यांसोबत प्रेमसंबंध ठेवले आहेत. पुरुषांचे प्रमाण ५१ टक्के तर महिलांचे ३६ टक्के आहे.
ऑफिस रोमान्समध्ये भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान हे केवळ बदलत्या नातेसंबंधांचे लक्षण नाही तर सामाजिक विचारसरणीतील बदलाचे प्रतिबिंब देखील आहे. पारंपारिक नातेसंबंधांसोबतच, भारतात खुल्या नातेसंबंधांसारख्या संकल्पनांबद्दल लोकांचे मत देखील बदलले आहे. ग्लीडेन या डेटिंग अॅपच्या सर्वेक्षणानुसार, देशातील ३५ टक्के लोक खुल्या नातेसंबंधात आहेत, तर ४१ टक्के लोक अशी व्यवस्था स्वीकारण्याचा विचार करू शकतात.
कोण कोणत्या देशात करण्यात आला रिसर्च?
ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि यूएस या ११ देशांमध्ये रिसर्च करण्यात आला असून मेक्सिको पहिल्या क्रमांकावर आहे.
तज्ज्ञांच्या मते, ऑफिसमध्ये जास्त वेळ एकत्र राहणे, व्यक्तीगत आयुष्यातील ताण, भावनिक सपोर्टची गरज या कारणांमुळे यामुळे अशी नाती नैसर्गिकपणे तयार होत आहेत.
महिलांमध्ये करिअरची खबरदारी
महिला करिअरबाबत अधिक जागरूक असण्याची शक्यता जास्त होती. सुमारे २९ टक्के महिलांनी सांगितले की त्यांना ऑफिस रोमान्स करण्यास टाळाटाळ होते कारण त्याचा त्यांच्या व्यावसायिक वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पुरुषांसाठी हा आकडा २७ टक्के होता. उल्लेखनीय म्हणजे, १८ ते २४ वयोगटातील तरुण कर्मचारी ऑफिसच्या बाबींबद्दल सर्वात जास्त सावध असल्याचे दिसून आले, त्यांना भीती होती की अशा नातेसंबंधामुळे त्यांचे नवीन करिअर खराब होऊ शकते.
वाढते प्रमाण आणि परिणाम
विवाहित लोकांसाठी असलेल्या ‘ग्लीडन’ या डेटिंग ॲपने केलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणानुसार, ३५ टक्के भारतीय सध्या ‘ओपन रिलेशनशिप्स’मध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीदाराने परवानगी दिल्यास ४१ टक्के लोक तसा विचार करण्यास तयार आहेत. विशेष म्हणजे, ही प्रवृत्ती फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाहीये. तामिळनाडूतील कांचीपुरमसारख्या शहरांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये सर्वाधिक रस असल्याचे नोंदवले गेले आहे. या निष्कर्षांवरून हे दिसून येते की, भारताची विकसित होत असलेली नातेसंबंधांची संस्कृती वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामधील रेषा पुसट करत आहे. विवाहबाह्य कार्यालयीन प्रेमसंबंधांमध्ये कोलकाता आणि मुंबई आघाडीवर असून येथील ३५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.
‘ऑफिस अफेअर’चा ट्रेंड का वाढतो ?
जेव्हा एक जोडीदार खूप नियंत्रण ठेवणारा किंवा जास्त अवलंबून असतो, तेव्हा दुसऱ्याला अडकल्यासारखे वाटू शकते आणि तो स्वातंत्र्यासाठी धडपडतो, त्यामुळे नातेसंबंधातील चित्र बदलते. याव्यतिरिक्त, जेव्हा शारीरिक जवळीक कमी होते किंवा जोडीदार समाधानकारक नसतो, तेव्हा या भावनिक अंतराकडे दुर्लक्ष करणे अधिक कठीण होते, ज्यामुळे काही लोक बाहेर पर्याय शोधू लागतात. या सर्वेक्षणाच्या निर्मात्यांनी विवाहबाह्य कार्यालयीन प्रेमसंबंधांचे मुख्य कारण म्हणून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागणारे कामाचे तास आणि उच्च ताण असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे समोर आलेल्या माहिती नुसार ऑफिस अफेअर्समध्ये भारत मागे नाही हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर पुढे देखील ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र समोर असलेली ही माहिती धक्कादायक असून चिंतेचा विषय बनणार येवढ नक्की.