Samvad Setu Media

[gtranslate]

At least twelve people were killed on Monday evening after a car exploded near the Red Fort landmark in Indian capital Delhi.

At least twelve people were killed on Monday evening after a car exploded near the Red Fort landmark in Indian capital Delhi.

delhi attack

Is Delhi blast a terror attack? Information is Shoking !

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ घडलेला स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला ? समोर आलेली माहिती धक्कादायक!

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात पर्यटक आणि नागरिकांची मोठी गर्दी असते. दिवसभर काम करून थकलेला व्यक्ती आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आतुर असतो. मात्र आयुष्यातील शेवटचा क्षण कधी असेल हे कोणालाही माहीत होत नाही. असंच एक प्रसंग दिल्लीमध्ये घडला आणि दिली हादरून गेली. सोमवारची सायंकाळ ही दिल्ली व संपूर्ण भारत वासियांसाठी काळा दिवस ठरला.

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्थानकाच्या बाहेर सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी प्राण घातक हल्ला झाला. या हल्ल्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तर हा एक दहशतवादी हल्ला होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेप्रकरणी तपास यंत्रणांकडून सखोल तपास केला जात आहे. तसेच पोलिसांकडून ही घटना घडण्याआधी मोठी कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं होतं. तसेच फरिदाबाद येथे स्फोटकं देखील सापडली होती. या प्रकरणी तपास यंत्रणांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घटना कशी घडली ?

सोमवारी सायंकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर कारला आग लागली आणि जवळच उभ्या असलेल्या एक-दोन गाड्यांनाही आग लागली. हा स्फोट बॉम्बस्फोट होता की सीएनजी टँकचा स्फोट हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी असल्याचे समोर आल आहे.

धक्कादायक माहिती समोर

दिल्लीच्या फरिदाबादमध्ये बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच स्फोटासाठी वापरले जाणारे अमोनिअम नायट्रेटचं गोडाऊनही याच फरिदाबादमध्ये होत. या प्रकरणातला मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद असल्याची माहिती समोर आली आहे. उमर मोहम्मद फरिदाबादमध्ये राहून डॉक्टर म्हणून प्रॅक्टिसही करायचा आणि दुसरीकडे बॉम्ब बनवण्याची फॅक्टरीदेखील चालवायचा. तो दहशतवादी कारवायांचा कट आखायचा. त्याच्या बॉम्बच्या फॅक्टरीपर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्यानंतर मोठा कट उधळला गेला. तसेच उपरने अमोनियम नायट्रेटचं गोडाऊनही फरिदाबादमध्ये बनवलं होतं, असं तपासात समोर आले आहे.

कोण होता डॉ. उमर मोहम्मद ?

– डॉ. उमर मोहम्मद हा काश्मीर येथून आला होता.
– त्याने दौज गावात आपला अड्डा बनवला होता.
– तिथे खाली दुकानं आणि वरच्या माळ्यावर असणाऱ्या खोल्यांमध्ये बॉम्ब बनवले जायचे.
– जम्मू काश्मीर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला तेव्हा तिथे टायमर, सर्किट आणि बॉम्ब बनवण्याचे इतर साहित्य मिळाले.
– आरोपींनी अमोनियम नायट्रेटचा साठा ठेवण्यासाठी फतेहपूर तागा या गावात घर भाड्याने घेतलं.
– तिथे अमोनियम नायट्रेट जमा केलं जायचं.
– जेव्हा बॉम्ब बनवायचा असेल तेव्हा दौज गावात जिथे ते राहायचे तिथे आणलं जायचं.
– या संपूर्ण घटनेचा मास्टरमाईंड हा डॉ. उमर मोहम्मद होता. त्याच्यासोबत मुझम्मील आणि इरफान ही दोन डॉक्टरदेखील होती.


2021 पासून सुरु होतं षढयंत्र

दिल्लीमध्ये झालेला हा हल्ला हा एक दहशतवादी हल्ला असल्याच आता स्पष्ट झालं आहे. या हल्ल्याचा षढयंत्र 2021 पासून सुरु झालं होतं, अशी धक्कादायक माहिती आतापर्यंत तपासात समोर आली आहे. त्याचबरोबर आरोपींची मोठी टोळी असून देशातील विविध भगत ही टोळी सक्रिय होती. आता आरोपींच्या टार्गेटवर आणखी काय-काय होतं त्याबाबतही माहिती गोळा करणं तपास यंत्रणांपुढे आव्हान आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींचा एक साथीदार हा फरार असल्याचीदेखील माहिती आहे. त्याचादेखील शोध सुरु आहे.

मुंबईत हाय अलर्ट

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. आणि 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे दिल्लीत भीती पसरली आहे. उत्तर प्रदेश आणि मुंबईत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

तर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. फॉरेन्सिक टीमही तपास करत आहे. स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. संसद भवन, ऐतिहासिक इमारती आणि सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यांचा तपास करणारी संस्था एनआयएची एक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.

दिल्लीमध्ये कधी स्फोट झाले आहेत?

  • 25 मे 1996 : लाजपत नगर सेंट्रल मार्केटमध्ये बॉम्बस्फोट – 16 जणांचा मृत्यू.
  • 1 ऑक्टोबर 1997 : सदर बाजारजवळ दोन बॉम्बस्फोट – 30 जण जखमी.
  • 10 ऑक्टोबर 1997 : शांतीवन, कौडिया पुल आणि किंग्जवे कॅम्प परिसरात तीन स्फोट – एक ठार, 16 जखमी.
  • 18 ऑक्टोबर 1997 : राणी बाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट – एक ठार, 23 जखमी.
  • 26 ऑक्टोबर 1997 : करोल बाग मार्केटमध्ये दोन स्फोट – एक ठार, 34 जखमी.
  • 30 नोव्हेंबर 1997 : लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट – तीन ठार, 70 जखमी.
  • 30 डिसेंबर 1997 : पंजाबी बागजवळ बसमध्ये स्फोट – चार ठार, 30 जखमी.
  • 18 जून 2000 : लाल किल्ल्याजवळ दोन स्फोट – दोन ठार, 12 जखमी.
  • 16 मार्च 2000 : सदर बाजारात स्फोट – सात जखमी.
  • 27 फेब्रुवारी 2000 : पहाडगंजमध्ये स्फोट – आठ जखमी.
  • 14 एप्रिल 2006 : जामा मशिदीत दोन स्फोट – 14 जखमी.
  • 22 मे 2005 : लिबर्टी आणि सत्यम सिनेमागृहात दोन स्फोट – 1 ठार, 60 जखमी.
  • 29 ऑक्टोबर 2005 : सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे दोन स्फोट – अंदाजे 59-62 जण ठार, 100+ जण जखमी.
  • 13 सप्टेंबर 2008 : करोल बाग (गफ्फार मार्केट), कनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास-1 येथे पाच स्फोट – 20-30 जण ठार, 90+ जण जखमी.
  • 27 सप्टेंबर 2008 : मेहरौली फ्लॉवर मार्केट (सराई) येथे स्फोट – 3 ठार, 23 जखमी.
  • 25 मे 2011 : दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट – कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागेल आहे. मात्र या स्फोटाचे लक्ष्य कोण होतं? हे अद्याप समोर आले नाही. तर हा स्फोट अपघाताने झाला का, की तो जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घडवून आणला गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर हा स्फोट जाणीवपूर्वक घडवून आणला गेला असेल, तर याच्या निशाण्यावर कोण होतं? सामान्य नागरिक त्याचे लक्ष्य होते का? असे अनेक प्रश्न आता भारतातील नागरिकांना पडले आहेत.

त्यामुळे आता दिल्ली आणि आसपासच्या ठिकाणी उच्च सतर्कता राखण्यात आली आहे. नागरिकांनी संशयास्पद वस्तू किंवा हालचाली पोलिसांना लगेच कळवाव्यात. सुरक्षित रहा. अधिकृत माहितीच पाहा. असे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्याचसोबत या हल्ल्यामध्ये ज्या निष्पाप लोकांना आपला प्राण गमवावा लागला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची संधी मिळावी, हिचं ईश्वर चरणी प्रार्थना

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.